घरलाईफस्टाईलनिरोगी त्वचेसाठी काही घरगुती उपाय

निरोगी त्वचेसाठी काही घरगुती उपाय

Subscribe

निरोगी त्वचेला उत्तम आरोग्याचे प्रतिक मानले जाते. त्वचा डागरहित आणि कांतियुक्त बनवण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय कोणते ते जाणून घेऊया.

लिंबू
चेहर्‍यावर लिंबाचा रस लावल्याने त्वचेचा पीएच लेव्हल संतुलित राहतो. लिंबाच्या रसाने काही वेळ मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्यावा. लिंबाच्या रसामुळे त्वचा टोन होते. त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या जखमा असतील तर लिंबाचा रस लावू नये.

- Advertisement -

काकडी
लिंबाच्या रसात जर काकडीचा रस मिसळून चेहर्‍यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावला तर चेहर्‍यावरील टवटवीतपणा कायम राहतो. याचा नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.

दूध
कच्चे दूध हे चेहर्‍यासाठी एक प्रकारचे नैसर्गिक ब्लीच आहे. कच्चे दूध चेहर्‍यावर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या, डाग नाहीसे होतात. रात्री झोपताना नियमित कच्चे दूध चेहर्‍याला लावल्यास त्वचा निरोगी बनते.

- Advertisement -

मध
मधामुळे चेहर्‍याला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ राहते. खास करुन कोरडी त्वचा असलेल्यांनी नियमित चेहर्‍याला मध लावल्यास त्यांच्या त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा निरोगी बनते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -