घरलाईफस्टाईलघरगुती 'हेअर पॅक'

घरगुती ‘हेअर पॅक’

Subscribe

लिंबू हे फळ बाराही महिने बाजारात आढळून येते. या फळाचे उत्तम असे लाभदायी फायदे आहेत. मात्र केसांसाठी लिंबू हा एक उत्तम असा उपाय आहे. केस मजबुत आणि दाह बनवण्यासाठी लिंबाचा वापर केल्यास केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच तेल न लावता देखील काही घरगुती उपाय केल्याने देखील केस मजबुत आणि दाट होऊ शकतात. जाणून घेऊया असे काही घरगुती हेअर पॅक

ऑलिव्ह ऑइल हेअर पॅक

- Advertisement -

ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबूचा रस मिसळून केसांच्या मुळाला लावल्याने केस गळती थांबण्यास मदत होते. आठवड्यातून तीन दिवस हा पॅक केसांना लावल्याने केसांना मजबुती देखील मिळते.

आवळ्याचा हेअर पॅक

- Advertisement -

दोन चमचे आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करुन हा तयार केलेला हेअर पॅक केसांना लावल्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. तसेच केसातील कोंडा देखील दूर होतो. त्यामुळे दररोज केसांना पॅक लावल्यामुळे केस देखील सॉफ्ट होण्यास मदत होते.

दह्याचा हेअर पॅक

केसांची शायनिंग वाढण्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे. दह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून तयार होणार हा हेअर पॅक केसांना लावल्यामुळे केसांची शायनिंग वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा हा पॅक केसांना लावल्यामुळे केस मऊ देखील होण्यास फायदा होतो.

नारळ तेल हेअर पॅक

नारळाचे तेल आपण नेहमी केसांना लावतो. यामुळे केस मजबुत होण्यास मदत होते. मात्र नारळापासून तयार केलेला हेअर पॅक केसांना लावल्यामुळे केस अधिक मजबुत होण्यास मदत होते. हा नारळ हेअर पॅक तयार करण्यासाठी नारळ तेलात थोडासा लिंबू रस मिसळून तयार होणारा हेअर पॅक केसांना चांगली मजबुती देतो.

अंड्याचा हेअर पॅक

केसांचा ड्रायनेस कमी करण्यासाठी अंडे हा एक रामबाण उपाय आहे. अंड्यातील पिवळा बलक बाजूला काढून त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करुन तयार होणारा हेअर पॅक केसांना लावा. यामुळे केसांचा ड्रायनेस कमी होऊन केस सॉफ्ट होण्यास मदत होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -