घरताज्या घडामोडीहाय हिल्स घालतं असालं तर सावधान!

हाय हिल्स घालतं असालं तर सावधान!

Subscribe

अनेक मुली सुंदर आणि उंच दिसण्यासाठी हिल्सच्या सँण्डलचा वापर करतात. त्यासाठी त्या नियमित पणे हिल्स सँण्डल घालतात. मात्र नियमित पणे हिल्स घालणं हे खूप धोकादायक असते. त्यामुळे आज आपणं हिल्स सँण्डलचे परिणाम जाणून घेणार आहोत.

१) गुडघ्याला ताण येणे

दररोज हिल्स घातल्यावर गुडघ्यावर ताण येण्याची शक्यता असते. तसंच पायदुखी, सांधेदुखीचा देखील त्रास होण्यास सुरुवात होते. याशिवाय हिल्सचा परिणाम वजनावर पडत असतो. तुम्ही जर हिल्स वापरत असाल तर तुमच्या चालण्याच्या आणि उभं राहण्याच्या पद्धतीत फरक पडतो. पायांच्या मसल्सवर दबाव येत असतो.

- Advertisement -

२) पायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता

हिल्सच्या चप्पला घातल्यानंतर आपल्याला आरामदायी वाढत नाही. हिल्सच्या चप्पला घातल्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी, पायांना सुज येणं या समस्या उद्भवू लागतात. याशिवाय पायांच्या बोटांवर दबाव येऊन रक्तवाहिन्यात ब्लॉक होण्याची देखील शक्यता असते.

३) हायपर टेंशनची समस्या

हिल्समुळे २६ टक्के ताण हा गुडघ्यावर येतो. तसंच पाय दुखणे, थकवा येणे असा त्रास होण्यास सुरुवात होते. या हाय हिल्समुळे हायपर टेंशनची समस्या जाणवू लागते.

- Advertisement -

४) पायाच्या नसा दुखण्यास सुरुवात

अनेक ठिकाणी रस्ते खडबडीत असल्यामुळे हाय हिल्स घातलेल्या तरुणीचा तोल जाऊन पायाला ईजा होते. यामुळे पाय मुरगळण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पायाच्या नसा दुखण्यास सुरुवात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -