घरलाईफस्टाईलमहत्त्व अक्षय तृतीयेचे...

महत्त्व अक्षय तृतीयेचे…

Subscribe

या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानले जाते.

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व असते. या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा मानली जाते. या दिवशी केले जाणारे कोणतेही काम केले जाते त्याचा परिणाम हा चांगलाच होतो. हिंदू धर्मानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयाला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. या दिवसाला आखाजी म्हणून ही संबोधले जाते.

या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानले जाते. यंदाच्या ७ मे रोजी असलेल्या दिवशी सकाळी ६. २६ पासून ११.४७ पर्यंत या कालावधीत सोने खरेदी करता येणार आहे.

- Advertisement -

या दिवसाचे महत्त्व

हे पर्व भगवान विष्णुला समर्पित केलेले असते. असे मानले जाते की, या दिवशी विष्णुंच्या अवतारात परशुरामाचे पृथ्वीवर जन्म झाला होता. या कारणाने अक्षय तृतीया या दिवसासास परशुरामाचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करण्यात येते. याशिवाय असे ही मानले जाते की, या दिवशी गंगा नदीचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. या व्यतिरिक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपुर्णेचा जन्मदिवस ही मानला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया एक असल्याने या दिवशी मोठी लग्न तिथी असल्याने विवाह सोहळ्यापासून होणारे धार्मिक कार्य शुभ मानले जाते.

या दिवशी या वस्तू केल्या जातात दान

अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दान-धर्मामुळे मिळणारे पुण्य दुप्पटीने वाढते. या दिवशी चांगल्या, प्रसन्न मनाने साखर, धान्य, फळ-भाज्या, कपडे आणि सोने चांदीचे मोठ्या प्रमाणात दान केले पाहिजे.

अक्षय तृतीयेचे माहात्म्य

  • जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
  • या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
  • शुभ कार्ये या दिवशी होतात.
  • श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते.

अक्षय तृतीयेची पूजा व‍िध‍ी

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.
  • काही माणसे या दिवशी उपवास देखील करतात.
  • सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पिवळे कपडे परिधान केले जातात.
  • या दिवशी गरिबांना अन्नदान तसेच दान करणे शुभ मानले जाते.
  • शेतकरी बांधव या दिवशी देवाला चिंचेचा नैवेद्य दाखवतात यामुळे असे मानले जाते की, वर्षभर चांगले धान्याचे उत्पादन होते.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -