घरलाईफस्टाईलVaselineचे आरोग्यदायी फायदे

Vaselineचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

जाणून घ्या Vaselineचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात Vaselineचा सर्रास वापर केला जातो. बऱ्याचदा हिवाळ्यात त्वचा आणि ओठांसाठी Vaseline उपयुक्त ठरते. मात्र, याव्यतिरिक्त Vaselineचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. ते कोणते आहेत जाणून घेऊया.

रुक्षपणा दूर होतो

- Advertisement -

Vaseline आपल्या रुक्ष कोपऱ्यांच्या भेगा ठीक करण्यास मदत करते आणि काळे झालेले कोपरे देखील स्वच्छ करतो. फक्त रुक्ष झालेल्या कोपऱ्यांना Vaseline लावा आणि रुक्षपणा दूर करा.

चमक वाढेल

- Advertisement -

कोपरे, गुडघे आणि तळपायाच्या मागील भागास Vaseline लावा. यामुळे काळ्या रेषा लपतील आणि चमक वाढेल.

पापण्या लांब होण्यास मदत

पापण्या लांब आणि सुंदर हव्या असल्यास, थोडंसं Vaseline लावावे. यामुळे पापण्या सुंदर आणि चमकदार दिसतील.

मेकअप रिमूव्हर

Vaseline आपण मेकअप रिमूव्हर प्रमाणे देखील वापरू शकता. आपला मेकअप स्वच्छ करण्यासाठी थोडंसं Vaseline लावून त्याला कापसाने स्वच्छ करा आणि चेहरा धुऊन घ्या. यामुळे आपली त्वचा मऊ होईल.

चेहऱ्याला चमक येते

शेव्हिंग केल्यावर चेहऱ्यावर Vaselineचा वापरा करावा. यामुळे त्वचेला मऊ ठेवण्यास मदत होते आणि रुक्षपणा देखील नाहीसा होतो. याशिवाय हे आपल्या चेहऱ्याची चमक देखील वाढवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -