घरलाईफस्टाईलजाणून घ्या 'मूगडाळी'चे भन्नाट फायदे

जाणून घ्या ‘मूगडाळी’चे भन्नाट फायदे

Subscribe

बऱ्याचदा आपण वरण बनवण्यासाठी तूरडाळीचा सर्रास वापर करतो. पण, या तूरडाळीसोबत जर मूगडाळीचा देखील तुम्ही आहारात वापर केल्यास आरोग्यालाही त्याचा चांगला फायदा होईल. कारण मूगडाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूगडाळीचे वरण, मूगडाळीची खिचडी फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे मूगडाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन देखील असतात. त्यामुळे त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. यासह अजून कोणते फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत.

सुरकुत्या

- Advertisement -

मूगडाळ जितकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तशीच ती स्किन करता देखील तितकीच लाभदायक आहे. मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मूगडाळ फायदेशीर ठरते.

पोटाचा त्रास

- Advertisement -

मूग हा पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. त्यामुळे पोटात गॅस जमा होण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.

केसांसाठी लाभदायक

मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.

लठ्ठपणा

मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधल्या वेळेत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणे फायदेशीर आहे.

बॉडी डिटॉक्स

मूगडाळीचे पाणी नियमित सेवन केल्याने शऱीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. याने शरीराची आतून स्वच्छता होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -