घरलाईफस्टाईलस्टफ्ड इडली रेसिपी

स्टफ्ड इडली रेसिपी

Subscribe

स्टफ्ड इडली रेसिपी नक्की करुन पहा

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा कामावरुन सायंकाळी घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘स्टफ्ड इडली रेसिपी’ नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -
  • दोन ते अडीच कप इडली पीठ
  • थोडेसे तेल
  • सारणासाठी लागणारे साहित्य
  • ३/४ कप ताजा खवलेला नारळ
  • २ टिस्पून काजू तुकडा
  • २ टिस्पून बेदाणे
  • २ टिस्पून मिरची – कोथिंबीर पेस्ट
  • १/२ टिस्पून लिंबाचा रस
  • चवीपुरते मीठ

कृती

सारणासाठी दिलेले सर्व साहित्य मिक्स करावे. इडली स्टॅण्डला तेलाचा हात लावावा. त्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये तळाला २ अडीच इंच पाणी गरम करण्यास ठेवावे. इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यात नारळाचे सारण पेरा आणि इडलीचे पीठ घालावे. त्यानंतर १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात आणि ५ मिनिटांनी कुकर उघडून इडल्या काढाव्यात. तसेच गरमच सर्व्ह कराव्यात. या साहित्यांनी १५ मध्यम आकाराच्या इडल्या बनतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -