घरलाईफस्टाईलदात किडण्याची शक्यता लहान मुलांमध्ये अधिक असते का?

दात किडण्याची शक्यता लहान मुलांमध्ये अधिक असते का?

Subscribe

दातांची किड लहान मुलांमध्ये जलद गतीने पसरत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कोणीही पाहुणे आले की लहान मुलांना आनंद होतो. कारण, नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांच्यासाठी मिठाई घेऊन येतात. मात्र, योग्य काळजी घेतली नाही, तर दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीच मुलांचे दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनकडून अलीकडेच आलेल्या माहितीतून दात पोकळ होण्याबाबत चिंताजनक प्रवाह पुढे आले आहेत. अमेरिकेत २ ते ५ वर्षांमधील मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण १५.२ टक्क्यांनी वाढले आहे. बालरोग व नवजातअर्भक विभाग तज्ञ डॉ. मुबाशिर शाह यांनी ही माहिती दिली आहे.

या वयात घ्या दातांची काळजी

अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक डेंटिस्ट्रीने २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील सुमारे ६० टक्के मुलांना वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत दात किडण्याचा अनुभव येतो. किडलेल्या दातांमुळे, विशेषत: त्यावर उपचार झाले नाहीत तर, प्रादुर्भाव, चावण्यात अडचणी आणि अगदी कुपोषणासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. कीड जर तीव्र स्वरूपाची असेल, तर त्यामुळे गळू होऊ शकते आणि त्याचा मुलाच्या कायमस्वरूपी येणाऱ्या दातांवर परिणाम होतो. २ वर्षाच्या वयात मुलाचे दात पोकळ झालेले असतील तर त्याला खूप वेदना आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. खाताना त्रास होतो, शाळेत लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात. बालवाडीच्या वयातील मुलांच्या दातांवरील किडीवर उपचार न होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती आहे.

- Advertisement -

दात किडणे हा आजार

दात किडणे हा मुळात बहुअंगी आजार आहे. यामध्ये तीन घटकांच्या संयोगांची परिणती दात किडण्यात होते: दात, कॅरिओजेनिक जीवाणू आणि किण्वनशील (फर्मेंटेबल) कर्बोदके. या संयोगाचा परिणाम दातावर किती काळ होतो हेही महत्त्वाचे आहे. चिकट अन्नपदार्थ, कठीण कॅण्डीज अधिक काळापर्यंत टिकणाऱ्या जीवाणूंचा स्रोत असतात. केवळ ठराविक अन्नपदार्थांमुळेच दातांच्या समस्या निर्माण होतात असे नाही, तर ते घेण्याच्या वेळांमुळेही समस्या निर्माण होत असल्याचे आढळले आहे. मुलांचे दात दिवसभरात विविध द्रवपदार्थांच्या संपर्कात येतात. कॅरिओजेनिक जीवाणूंच्या संक्रमणाचा सर्वाधिक आढळणारा स्रोत म्हणजे वाईट मौखिक आरोग्य असलेली.

किड लहान मुलांमध्ये जलद वाढते

दात किडून जखम होणे हा दात किडण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा असतो. दातातील पोकळी केवळ सक्रिय आजारच दाखवत नाहीत, तर पक्के (कायमस्वरूपी) दात येण्याच्या प्रक्रियेतील किडीची निदर्शक असते. पांढरे डागसदृश व्रण- डिकॅल्सिफाइड भाग हेही धोक्याचे असतात. प्राथमिक दंतवैद्यकीय कीड लहान मुलांमध्ये अत्यंत जलद गतीने वाढते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तोंडात पांढरे व्रण दिसल्यानंतर सक्रिय जखम होण्याचा धोकाही खूप अधिक असतो. दातात पोकळी पटकन निर्माण होत असल्याने, २-५ वर्षांच्या मुलांना पिडिअॅट्रिक डेंटिस्टकडे घेऊन जाण्याची गरज नाही हा समज आता दूर होत आहे. मुलाच्या पहिल्या वाढदिवसादरम्यान पहिले दात येऊ लागतात तेव्हाच डेंटिस्टकडून तपासून घेण्याचा सल्ला काही डॉक्टर्स देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -