घरलाईफस्टाईलवजन नियंत्रित करण्यासह खरबूजाचे 'हे' आहेत फायदे

वजन नियंत्रित करण्यासह खरबूजाचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

खरबूजाचे 'हे' आहेत फायदे

आपल्याला डॉक्टर नेहमी सल्ला देतात की, सिझननुसार येणाऱ्या सर्व फळांचे सेवन करा. कारण फळ आरोग्यासाठी फारच लाभदायक असतात. त्यातीलच एक फळ म्हणजे खरबूज. या खरबूजामध्ये भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असतात ज्याचा आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला फायदा होतो. खरबूजाने वजन कमी होते. यासह अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

बद्धकोष्ठतेचा त्रास

- Advertisement -

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी खरबूजाचे आवर्जून सेवन करावे. कारण यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने अन्न पचण्यास मदत होते.

भूक वाढते.

- Advertisement -

भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावे. यामुळे भूक वाढण्यास मदत होते.

त्वचेचा पोत सुधारतो

खरबूजाचे नियमित सेवन केल्यास त्याचा त्वचेकरता चांगला फायदा होतो. यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, फॉलिक अ‍ॅसिड, सी, ई, के आणि ए अशा जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने त्वचा मृदू, चमकदार व्हायला मदत होते. शुष्क त्वचा, काळे डाग आदी विकारांवर गुणकारी ठरते.

प्रसूतीनंतर दूध वाढण्यास मदत

खरबूज या फळात लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असल्याने बाळ आणि माता दोघांसाठी हे फळ फायदेशीर ठरते. गरोदरपणात सुरुवातीच्या काळात येणारा सकाळचा थकवा कमी होण्यास मदत होते.

शरीराचे तापमान नियंत्रित

उन्हाळ्यात दररोज एकदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

स्मरणशक्ती वाढते

खरबूज या फळाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

अतिरक्तस्रावापासून आराम

खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना होणाऱ्या अतिरक्तस्रावापासून आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -