घरलाईफस्टाईलबटाटा - पनीर पॅटीस

बटाटा – पनीर पॅटीस

Subscribe

बटाटा - पनीर पॅटीस रेसिपी

बऱ्याच जणांचा काहीतरी वेगळे आणि हटके खाण्याचा मूड असतो. अशावेळी अनेकांना काय करुन खावे, असा प्रश्न पडतो. त्यातच मुलांनी देखील ते आवडीने खाल्ले पाहिजे, असे देखील वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, असे हटके पॅटीस दाखवणार आहे.

साहित्य

- Advertisement -

४ उकडलेले बटाटे
१/४ किलो पनीर
१/२ चमचा आले पेस्ट
३ ते ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१/२ वाटी कोथिंबीर
१ लिंबू
राजगिऱ्याचे पीठ
तेल
मीठ

सारणासाठी – भिजवलेल्या बदामाचे बारीक काप, मनुका, दाण्याचा कुट.

- Advertisement -

कृती

प्रथम उकडलेले बटाटे आणि पनीर एकत्र कुस्ककरुन घ्यावे. आता, त्यामध्ये अर्धा चमचा आल्याची पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, लिंबांचा रस आणि मीठ मिसळावे. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करुन घ्यावेत. अशाप्रकारे तयार झालेल्या पॅटिसच्या आवरणाचे लहान लहान गोळे तयार करावेत. त्यापैकी एक गोळा हातावर घेऊन त्याला बोटांनीच थोडे खोलगट बनवून आत सारण भरण्यासाठी जागा करावी. आता, त्यावर बदामाचे काप, मनुका आणि दाण्याचा कुट ठेवून वरील आवरण त्यावर सर्व बाजूंनी आवळून घ्यावे. असे, पॅटिस करुन घेतल्यावर ते राजगिऱ्याच्या पिठात बुडवावेत आणि फ्राय पॅनवर थोड्या तेलात, मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान लालसर होईस्तोवर परतून घ्यावेत. अशाप्रकारे, तयार झालेले गरमागरम कुरकुरीत आणि खमंगसे पॅटिस चटणीसोबत सर्व्ह करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -