घरलाईफस्टाईलLong Distance Relationship मध्ये नातं टिकावायचंय... तर 'या' गोष्टी करा Follow

Long Distance Relationship मध्ये नातं टिकावायचंय… तर ‘या’ गोष्टी करा Follow

Subscribe

लाँग डिस्टन्स रिलेशनशीप यशस्वी होण्यासाठी लहान छोट्या गोष्टींचा विचार करून नातं अधिक खुलवता येऊ शकते.

लाँग डिस्टन्स रिलेशनशीप सांभाळणे खूप अवघड असते. नात्यात लाँग डिस्टन्स निर्माण झाल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याचा धोकाही जास्त असतो. हे नातं मजबूत करण्यासाठी लहानशा गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशीप यशस्वी होण्यासाठी लहान छोट्या गोष्टींचा विचार करून नातं अधिक खुलवता येऊ शकते.

नात्यात सुसंवाद ठेवा

लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये एकमेकांशी संवाद साधणे फार महत्वाचे आहे. जोडीदारास वेळोवेळी कॉल करत रहा. आपण वेळोवेळी कॉल करू शकत नसल्यास मॅसेजवर बोलत रहा. एकमेकांशी संवाद ठेवल्याने नातं मजबूत विश्वासाचं होण्यास मदत होईल. कधीकधी व्यस्त असल्याने जोडीदारास कॉल करणं किंवा मॅसेज पाठवणे शक्य फ्री होताच प्रथम जोडीदारास कॉल करा किंवा मॅसेज करा. बहुतेकदा लाँग डिस्टन्स रिलेशनशीप ब्रेक होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे Communication Gap असते.

- Advertisement -

वेळात वेळ काढून Video call करा

लाँग डिस्टन्स रिलेशनशीप घट्ट करण्यासाठी व्हिडिओ कॉलचा आधार तुम्ही घेऊ शकतात. लाँग डिस्टन्स रिलेशनशीप कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर दररोज थोडा वेळ काढा आणि Video call करून एकमेकांशी गप्पा मारा.

एकमेकांना आपले फोटो शेअर करा

लाँग डिस्टन्स रिलेशनशीप उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा Photo किंवा selfie तुमच्या जोडीदाराला पाठवत रहा. दिवसाच्या सुरूवातीला तुम्ही तुमचा एक फोटो रोज जोडीदारास पाठवू शकता. तुमचा जोडीदार फोटो पाहिल्यानंतर तुमची आठवण नक्की काढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारास फोटो देखील शेअर करण्यास सांगत जा. अशाने तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

- Advertisement -

भेटीसाठी आवर्जून वेळ काढा

लाँग डिस्टन्स रिलेशनशीपचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूरच रहाल. तुम्हाला जोडीदाराला भेटण्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे. एकत्र सुट्टीच्या दिवसाचा प्लान करा आणि Short one day Picnic ला जाऊन एकमेकांना वेळ द्या. असे केल्याने तुमचे नाते चांगले राहिल. जोडीदारासह सुट्टीचे नियोजन केल्यास तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी ही मिळेल. कोणतेही नातं मजबूत करण्यासाठी एकत्र वेळ घालवणं खूप महत्वाचे असते.


तुमचा जोडीदार सोशल मीडियावर जास्त रमतोय, वेळीच सावध व्हा…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -