घरलाईफस्टाईलगृहकर्ज घेताय या गोष्टी लक्षात ठेवा!

गृहकर्ज घेताय या गोष्टी लक्षात ठेवा!

Subscribe

गृहखरेदी करताना गृहकर्ज घेणे आता प्रत्येकालाच अनिवार्य बनले आहे. मात्र, अनेकांना याबाबत पुरेसे तांत्रिक ज्ञान नसते, त्याचा गैरफायदा घेऊन बँक, दलाल, बिल्डर यांच्याकडून फसवणूक होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे गरजेच्या आहेत, याचा ज्ञान असणे आवश्यक आहे.

१. पतमानांकन तपासा – कमी दराने गृहकर्ज मिळविण्यासाठी तुमचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले पतमानांकन नसेल तर ‘प्रीमियम’ भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे.

- Advertisement -

२. गृहकर्जाची मंजुरी मिळवा – घरखरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्राहकाने आपले ‘बजेट’ तपासावे. आपल्याला किती गृहकर्ज मिळू शकेल; तसेच किती ‘डाऊनपेमेंट’ करावे लागेल, याचा अंदाज घ्यावा.

३. ‘डाऊनपेमेंट’ किती असावे? – घर खरेदी करताना ग्राहकाने सर्वसाधारणपणे 10 ते 25 टक्के एवढ्या ‘डाऊनपेमेंट’ व्यतिरिक्त इतर खर्चाचाही विचार करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे स्टँप ड्यूटी, क्लब शुल्क, विकास शुल्क, इन्शुरन्स खर्च, सोसायटी डिपॉझिट आधी गोष्टींसाठी कर्ज मिळत नाही. त्यामुळे कोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळते आणि कशासाठी मिळत नाही, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

४. तरल (फ्लॉटिंग) व्याजदर – सर्वसाधारणपणे गृहकर्जदार हा आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी 20 ते 30 वर्षांचा कालावधी निवडतो. तरल दरांमध्ये वेगवेगळ्या बदलत्या व्याजदरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतात. त्यामध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक पर्यायांचाही समावेश असतो.

५. ‘डेली रिड्युसिंग’चा फायदा – दररोज कर्जाचा आकडा कमी होईल अशापद्धतीच्या व्याजदराचा (डेली रिड्युसिंग) पर्याय निवडता येतो. जर समजा एखाद्या ग्राहकाचा गृहकर्ज हप्त्याची तारीख 25 असेल आणि त्याने समजा त्याच महिन्याच्या 5 तारखेला आपला गृहकर्ज हप्ता जमा केला असेल तर ग्राहकाचे उरलेल्या 20 दिवसांवरील व्याज देणे वाचते.

६. गृहकर्जाचा विमा – गृहकर्जाची रक्कम साधारणपणे मोठी असते. सर्वसाधारणपणे वार्षिक उत्पन्नाच्या 5 ते 6 पट गृहकर्ज घेतले जाते. अशा मोठ्या गृहकर्ज रकमेसाठी विम्याचे पाठबळ घेणे गरजेचे असते. तसे पाठबळ घेतल्यास एखादी दुर्घटना घडली तरी त्याचा फटका गृहकर्जदाराच्या कुटुंबीयांस बसत नाही.

७. गृहखरेदी करण्यापूर्वी कर्ज नको – काही जण ‘डाऊनपेमेंट’साठीही कमी कालावधीचे वेगळे वैयक्तिक कर्ज काढतात. या कर्जाचा व्याजदर चढा असल्यामुळे बर्‍याच वेळी केवळ या कारणापायी ग्राहकाला गृहकर्ज नाकारले जाते. त्यामुळे गृहखरेदीपूर्वी वेगळे कर्ज काढू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -