घरलाईफस्टाईलSequence Saree : सिक्विन साडी धुताना घ्या खबरदारी

Sequence Saree : सिक्विन साडी धुताना घ्या खबरदारी

Subscribe

हल्ली सिक्वेन्स साडीचा फॅशन ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे महिलांच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला या साडीचे डिझाईन सहज सापडतील. विशेष म्हणजे सिक्विन साडी नेसल्याने त्याचा लूकही खूप क्लासी दिसतो. त्यामुळे या साडीला बहुतांश महिलांची पहिलीच पसंती राहते. अशातच कोणतेही कापड घातल्यानंतर ते धुणे आवश्यक आहे. जेणेकरून कपड्यावरील डाग आणि दुर्गंधी दूर होईल. त्याचप्रमाणे, साडी देखील धुणे आवश्यक आहे. पण आपण सर्व साड्या एकाच प्रकारे धुवू शकत नाही. तर आता आपण सिक्विन साडी धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून ही साडी खराब होणार नाही. याबद्दल जाणून घेणार आहोत.

Buy Red Sequence Saree Sequins Sari Usa Uk Party Wear Glitter Online in  India - Etsy

- Advertisement -

सिक्विन साडी धुताना ‘या’ गोष्टी फॉलो करा

  • आपण अनेकदा विसरतो की सर्व कपडे मशीनने धुण्यायोग्य नसतात.
  • मशीन वॉशिंगमुळे अनेक कपडे खराब होतात. यामध्ये सिक्वेन्स साडीचाही समावेश आहे.
  • जर तुम्ही सिक्विन साडी घरी धुत असाल तर यासाठी मशीन वापरू नका.
  • तर सिक्विन साडी हाताने धुतली पाहिजे. यामुळे साडीवरील सिक्वीन्स खराब होत नाहीत.

Sreemukhi stuns in Sequin embellished saree! | Fashionworldhub

सिक्विन साडी धुताना ‘अशी’ घ्या काळजी

  • सिक्विन साडी धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
  • गरम पाणी वापरल्याने ही साडी लगेच खराब होईल.
  • फक्त सिक्वीन्सच नाही तर गरम पाण्याने फॅब्रिकही कच्चा होतो, ज्यामुळे साडी फाटू शकते.
  • म्हणूनच चुकूनही गरम किंवा कोमट झाल्यावरही साडी धुवू नका.
  • साडी धुण्यासाठी तुम्ही शॅम्पू किंवा वॉशिंग सोल्यूशन वापरू शकता.
  • सिक्विन साडीला सोल्युशनमध्ये 5-10 मिनिटे भिजवून ठेवा.शेवटी साडी स्वच्छ पाण्याने धुवा.
  • साडी धुताना मुरगळू नका. फक्त वाहत्या पाण्याखाली ठेवा.
  • सिक्विन साडी सुकविण्यासाठी वॉशिंग मशीनचा ड्रायर वापरू नका. यामुळे तुमची संपूर्ण साडी खराब होईल.
  • तसेच ही साडी सावलीत किंवा पंख्याच्या हवेखाली वाळवा. बाहेर सुकत घालू नका. तसेच उन्हामुळे साडी खराब होवू शकते.
  • साडी वाळत घालताना स्वच्छ टेबलवर घाला. बाकी कोणत्या बाहेरच्या ठिकाणी सुकत घालू नका.
  • साडीवर कुठेतरी डाग पडला असेल तर संपूर्ण साडी धुवू नये. त्याऐवजी, फक्त डाग असलेली जागा स्वच्छ करा.
  • तसेच साडीवरचे डाग साफ करण्यासाठी ब्लीचसारख्या रासायनिक उत्पादनांचा वापर करू नका.
  • अशातच नैसर्गिक गोष्टींचा वापर करा जस की लिंबू आणि बेकिंग सोडा या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.

हेही वाचा : मळलेले उशीचे कवर असे धुवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -