घरलाईफस्टाईलकाय सांगताय? मिठाचे ६ प्रकार आहेत?

काय सांगताय? मिठाचे ६ प्रकार आहेत?

Subscribe

सहावा प्रकार आहे आरोग्यासाठी सर्वात उपयुक्त

आपल्या दररोजच्या जीवनात जसे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे जेवणासाठी मीठ ही देखील एक महत्त्वाची गरज आहे. कारण मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे चिमूटभर मीठ देखील जेवण रुचकर बनवण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच मीठ हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आतापर्यंत आपण बारीक मीठच पाहिले आहे. परंतु मीठाचे एक – दोन नाहीतर तब्बल सहा प्रकार असल्याचे समोर आले आहे. चला तर जाणून घेऊया हे मीठ कधी आणि केव्हा वापरले जाते.

खडे मीठ

समुद्राच्या पाण्याची वाफ करुन जे मीठ बनविले जाते त्यास खडे मीठ बोले जाते. हे मी समुद्राजवळील मिठागृहात बनविले जातात. या खडा मिठापासून बारीक मीठ बनविले जाते. तसेच हे मीठ माशांना लावले जाते. स्वच्छ चमकदार, चौकोनी तुकड्यांच्या आकारातील खडे मीठी हे आरोग्यास लाभदायक असते. प्रत्येक सामुद्रिक मिठामध्ये आयोडीन हे असतेच. शरीराला आयोडिनची जेवढी गरज आहे. तेवढी गरज खडे मिठातूनही भागते. त्यामुळे हे मीठ आरोग्यास फायदेशीर ठरते.

- Advertisement -

बारीक मीठ

सूक्ष्म, दाणेदार, आयोडीनयुक्त महागड्या मिठापेक्षा खडे मीठ वापरणे कधीही फायद्याचे असते. कारण शुभ्र आणि दाणेदार मीठ बनविताना अनेक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे ते शरीरास घातक होऊ शकते. मात्र, शक्यतो नागरीक बारीक मिळाचाच वापर करतात.

पादेलोण मीठ

पादेलोण मीठ जमिनीतून मिळवले जाणारे खनिजापासून बनविले जाते. पादेलोण मिठाचे खडे असतात. या मिठाचा रंग गुलाबीसर असतो. विशेष करुन हे मीठ बर्फाच्या गोळ्यावर आणि पाणीपुरी करता वापरले जाते. याला एक वेगळीच चव असते.

- Advertisement -

पोटॅशियम सॉल्ट

अधिक रक्तदाब असलेल्या व्यक्तींना जास्त मीठ खाण्यासाठी परवानगी नसते. अशा व्यक्तींना पोटॅशियम सॉल्ट खाण्याचा सल्ला दिला जातो.

टेबल सॉल्ट

हे अतिशय बारीक मीठ असते. आपण एखाद्या हॉटेल्समध्ये जातो. तेव्हा तेथे टेबलवर हे मीठ ठेवलेले असते. या मिठाला अजिबात पाणी सुटत नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा जेवणात हवे तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो. टेबल सॉल्टमध्ये प्रक्रिया करताना त्यामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात मिसळण्यात येते. मात्र, या मीठाच्या अति सेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते. तसेच किडनीवर दाब येतो. भरपूर पाणी शरीराबाहेर गेल्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्सचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही.

सैंधव मीठ

हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मीठ असते. सैंधव मीठ म्हणजे जे मीठ खाणीतून मिळते त्या मिठाला सैंधव मीठ म्हणतात. खाणीतून किंवा आटून गेलेल्या खाऱ्या तलावांतून उत्तखनन करून सैंधव मीठ बनविले जाते. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते.


हेही वाचा – शेंगदाणे आणि गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -