घरलाईफस्टाईल'असे' बनवा आरोग्यदायी पराठे

‘असे’ बनवा आरोग्यदायी पराठे

Subscribe

बऱ्याचदा ऑफिसवरुन घरी आल्यावर भूक लागते, अशावेळी काय खावे असा प्रश्न उपस्थित होतो. अनेक जण झटपट असा पराठ खाण्याचा सल्ला देतात. मात्र, आपण खाल्लेला पराठा आरोग्यासाठी देखील उत्तम असणे गरजेचे असते. याकरता पराठे आरोग्यदायी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत.

  • पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यामध्ये पालकाची पेस्ट, राजमाची पेस्ट, हरभऱ्याची पेस्ट घातल्यास पराठ्याची चव वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे पोषक घटक देखील वाढतात.
  • बऱ्याचदा पराठे बनवताना सारण करण्यासाठी बटाटे आणि पनीरचा वापर केला जातो. पण, त्याव्यतिरिक्त सोया, कॉर्न, अवाकाडो, ब्रोकोली आणि सातूचा वापर देखील करता येऊ शकतो. हे चवीला तर चांगलेच आहे त्याचबरोबर सुपर हेल्दी असतात.
  • पराठे बनविताना चव वाढविण्यासाठी त्यात कोथिंबीर, पुदिना, तुळशी किंवा ओवा देखील घालू शकता. ओवा घातल्याने पचनक्रिया चांगली होते.
  • पराठ्यात सारण भरताना आपण यामध्ये एक मूठ भोपळा बियाणे, सूर्यफुलाचे बियाणे मिसळू शकता. हे सर्व बियाणं ऊर्जा देण्यासह पौष्टिक घटकांनी देखील समृद्ध असतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -