घरलाईफस्टाईलनिरोगी शरीरासाठी आहारात तोंडली आवश्यक

निरोगी शरीरासाठी आहारात तोंडली आवश्यक

Subscribe

आहारमुल्यांच्या दृष्टीने तोंडली ही शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणार्‍या फळभाज्यांपैकी एक
आहे. तोंडली या खास भारतीय भाजीत भरपूर प्रमाणात प्रोटीन्स ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्वे आहेत.

इतर काही भाज्यांच्या तुलनेत तोंडली या भाजीमध्ये पोटॅशियम, फॉस्फोरस, आयर्न, झिंक आणि सेलेनियम जास्त आहे.

- Advertisement -

*तोंडलीमुळे रक्त शुद्धी होते.

*पचन सुधारते.

- Advertisement -

*लिव्हरचे कार्य व्यवस्थित चालते.

*उष्णतेमुळे तोंडात येणारे व्रण घालवण्यासाठी आणि तोंड आल्यावर कच्ची तोंडली खावी.

*तापामुळे जर तोंडाला चव नसेल तर कच्ची तोंडली खावी.

*तोंडली या फळभाजीमध्ये जवळ-जवळ ९४ टक्के पाणी असते.

*डायबिटीज, कॅन्सर आणि किडनीच्या आजारापासून दूर राहायचंय तर तोंडली खाणे हा चांगला उपाय आहे.

* यातील फायबर डायजेशन ठिक करण्यात मदत करते.

*तोंडलीत आयर्न असल्यामुळे अ‍ॅनिमिया दूर करण्यास मदत करते.

* तोंडलीमुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

* तोंडली कफनाशक आहेत.

* यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बिटा केरोटीन असते, जे कॅन्सरपासून दूर ठेवण्यास मदत करते.

* यातील व्हिटॅमिन ब्रेन पॉवर वाढवते त्यामुळे मेमरी चांगली राहते.

* तोंड्लीच्या भाजी व्यतीरिक्त त्याची पाने आणि फुले आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

* तोंडली खाल्ल्याने किडनीस्टोन होण्याची शक्याता कमी असते. तसेच ज्यांना किडनीस्टोन आहे त्यानी
तोंडली खाल्ली तर स्टोन निघतो.

*यात कॅल्शियम असते त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

* यातिल व्हिटॅमिन ‘सी’ शरिरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -