घरलाईफस्टाईलउटण्याचे सौंदर्यदायी फायदे

उटण्याचे सौंदर्यदायी फायदे

Subscribe

उटण्याचे शरीराला होणारे फायदे

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आकाश कंदील, दारासमोरील किल्ले आणि रांगोळ्यांसाठी लागणारे विविध रंग, विद्युत तोरणे आदी साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. विशेष म्हणजे बाजारात विविध प्रकारचे उटणे देखील दाखल झाले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीला उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. मात्र, हे उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया उटणे लावण्याचे फायदे

त्वचा निरोगी राहते

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळले जात. तसेच लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

- Advertisement -

चेहऱ्याला चमक देते

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.

सुरकुत्या टाळता येणार

त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे सामान्य असले तरी देखील त्या सहज दूर होऊ शकतात. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते.

- Advertisement -

चेहर्‍यावरील केस

अनेकांच्या चेहऱ्यावर केस असतात. त्यामुळे चेहरा काळ दिसतो. हे चेहऱ्यावरली केस काढण्यासाठी उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. यामुळे त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत होते.

त्वचा मुलायम

उटण्यात मध किंवा दूध टाकून लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -