घरलाईफस्टाईलClaustrophobia: सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया? वाचा या आजार आणि लक्षणाबद्दल

Claustrophobia: सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया? वाचा या आजार आणि लक्षणाबद्दल

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खळबळजनक दावे केले आहेत. या मुलाखतीमध्ये तिने सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे म्हटले होते. विमानात बसताना किंवा लिफ्टमध्ये गेल्यानंतर त्याला भीती वाटायची. त्यामुळे विमानात बसण्याअगोदर तो औषध घ्यायचा. रियाने हा दावा केल्यानंतर अनेकांना या आजाराबद्दल प्रश्न निर्माण झाले. तर आपण जाणून घेऊया या आजाराच्या लक्षणाबद्दल..

काय आहे क्लॉस्ट्रोफोबिया

क्लॉस्ट्रोफोबिया हा एका पद्धतीचा भीतीशी निगडीत असलेला आजार आहे. एन्झायटी डिसऑर्डर (चिंतारोग) प्रमाणेच हा आजार असतो, जो अनेकांना असतो. एका अभ्यासानुसार जगातील १० टक्के लोकांना या आजाराने ग्रासलेले आहे. यापैकी काही लोकांनाच या आजाराबद्दल कल्पना येते आणि ते त्यावर उपचार घेतात. क्लॉस्ट्रोफोबिया हा शब्द ग्रीक शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ होतो एक बंद जागा. IPSYCOM च्या एका अहवालानुसार क्लॉस्ट्रोफोबिया हा एक सामान्य मनाचा आजार आहे.

- Advertisement -

या आजाराच्या रुग्णांना बंद जागा किंवा छोट्या जागेत जाण्याची भीती वाटते किंवा अशा जागेत अडकल्यानंतर त्यांची घुसमट होते. काही लोकांना इतकी भीती वाटते की, लहान जागा दिसल्यानंतर त्यांना भीती वाटू लागते. त्यांना असे वाटते की आता आपल्याला श्वासच घेता येणार नाही.

क्लॉस्ट्रोफोबियाचे लक्षणे काय आहेत

– भीतीने कंप सुटणे

- Advertisement -

– श्वास घेण्यास अडचण होणे

– छातीत कसंतरी होण्याची भावना निर्माण होणे

– हृदयाचे ठोके वाढू लागणे

– एकदाचे त्या जागेतून बाहेर पडण्याची इच्छा प्रबळ होणे

– डोके दुखायला लागणे आणि चक्कर येणे

क्लॉस्ट्रोफोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तिला मेट्रो, सुरंग, छोटी जागा, लिफ्ट, बाथरुममध्ये आंघोळ करताना भीती वाटू लागते. या आजाराचे अनेक रोगी लिफ्टने प्रवास न करता पायऱ्यांनी जाणे पसंत करतात.

क्लॉस्ट्रोफोबिया या आजाराचे मुळ बालपणात असते. एखाद्या भयानक घटनेचा परिणाम मनावर कायमचा कोरला जातो. जसे की, लहान असताना एखाद्या खड्ड्यात पडणे, पालकांसोबत गेले असताना अचानक हरवले जाणे.. इत्यादी अनुभव लहानपणीच मनावर घातक परिणाम करतात. ज्याचे प्रतिबिंब मोठे झाल्यानंतर देखील दिसत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -