घरताज्या घडामोडीसारा अली खान आणि सुशांत ३ दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होते!

सारा अली खान आणि सुशांत ३ दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होते!

Subscribe

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बँकॉक ट्रिपचा उल्लेख केला आहे. सुशांत त्याच्या सहा मित्रांसोबत बँकॉक ट्रिपल गेला होता आणि या ट्रिपमध्ये त्याने ७० लाख रूपये खर्च केल्याचं रियाने त्या मुलाखतीत म्हटले होते. त्या ट्रिपमध्ये सुशांतबरोबर असणाऱ्या साबिर अहमदने या ट्रिपबाबत खुलासा केला आहे. ‘इंडिया टुडे टिव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत साबिरने या ट्रिपमध्ये काय घडलं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने अभिनेत्री सारा अली खानसुध्दा या ट्रीपमध्ये होती असं सांगितलं आहे.

काय घडलं ट्रीपमध्ये

बँकॉक ट्रिपदरम्यान साबिर हा सुशांतचा असिस्टंट होता. सुशांतच्या पीआरओ टीमसाठी या ट्रिपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुशांतसोबतच केदारनाथ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सारा अली खानसुद्धा या ट्रीपमध्ये होती. सुशांत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल झवेरी, अब्बास, सुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक आणि मी त्या ट्रीपमध्ये होतो.

- Advertisement -

डिसेंबर २०१८मध्ये प्रायव्हेट जेटने आम्ही थायलंडला गेलो. ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळे एकत्र समुद्रकिनारी गेलो होतो. पण नंतर सुशांत आणि सारा बाकीचे सर्व दिवस हॉटेलच्या रूममध्येच होते. आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो.

पण त्यावेळी त्सुनामीची शक्यता वर्तवल्यामुळे आम्हाला बँकॉकटी ट्रीपवरून लवकर परत यावे लागले. त्सुमानीची शक्यता वर्तवण्यात आल्याने बाकीचे सर्वजण भारतात परतले. पण विमानाची तिकिटं न मिळाल्याने मी आणि मुश्ताक बँकॉकमध्येच राहिलो. जवळपास महिनाभरासाठी आम्ही बँकॉकमध्ये राहिलो आणि सुशांतने खर्चासाठी त्याचा एटीएम कार्ड आम्हाला वापरायला दिलं होतं. असं साबिरने स्पष्ट केलं.

- Advertisement -

हे ही वाचा – Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती आपली वक्तव्ये का बदलतेय? कारण आले समोर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -