घरटेक-वेकAmazon Halo फिटनेस बँड लाँच, बॉडी फॅटची देणार अचूक माहिती

Amazon Halo फिटनेस बँड लाँच, बॉडी फॅटची देणार अचूक माहिती

Subscribe

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामासह फिटनेस बँडचा वापर करतात. त्यामुळे आता बाजारात फिटनेस बँडची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन अ‍ॅमेझॉनने आपला खास Amazon Halo फिटनेस बँड बाजारात आणला आहे. या फिटनेस बँडचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरकर्त्याला फिटनेस ट्रॅकिंग आणि हार्ट-रेटसह बॉडी फॅटची अचूक माहिती देते.

Amazon Halo ची किंमत

Amazon Halo फिटनेस बँडची किंमत सुमारे ४,७६४ रुपये आहे. हा बँड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो. सध्या या फिटनेस बँडला भारतात सुरू करण्याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

- Advertisement -

Amazon Halo स्पेसिफिकेशन

Amazon च्या नवीन Amazon Halo फिटनेस बँडमध्ये डिस्प्ले दिलेला नाही. या बँडमध्ये कार्डियो, बॉडी फॅट आणि टोन ट्रॅकिंग सारखे फीचर्स दिले आहेत. यामध्ये शरीरातील चरबी विषयी माहिती देणारी सर्वात खास बॉडी स्कॅनिंग फीचर दिले आहे, परंतु यासाठी वापरकर्त्यांना सदस्यत्व घ्यावे लागेल. त्याच वेळी, मोबाइल अॅपद्वारे वापरकर्ते हा बँड वापरू शकतात. इतर फीचर्सविषयी बोलायचे झाले तर कंपनीने या फिटनेस बँडमध्ये दोन मायक्रोफोन दिले आहेत, जे एका बटणाद्वारे चालू आणि बंद केले जाऊ शकतात. त्याशिवाय त्यामध्ये एलईडी इंडिकेटर लाईटही देण्यात आली आहे.

Amazon Halo ला 5ATM रेटिंग

Amazon Halo फिटनेस बँडला 5ATM चे रेटिंग मिळाली आहे. बँड परिधान करून वापरकर्ते पोहू शकतात. या व्यतिरिक्त या बँडमध्ये जीपीएस आणि वाय-फाय सपोर्ट देण्यात आला आहे. Android आणि iOS वापरकर्ते Amazon Halo फिटनेस बँड वापरू शकतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -