घरमहा @२८८भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३४

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३४

Subscribe

भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (विधानसभा क्र. १३४) विधानसभा मतदारसंघ आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हा क्रमांक १३ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३३१ मतदान केंद्र आहेत. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या सेटलमेंटमध्ये आणि दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसऱ्यांदा विजयाची संधी निश्चितच मिळणार असल्मायाचे दिसून येत आहे. त्यामुळे युती फॅक्टर हा महत्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसून येत आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत या मतदार संघावर २५ वर्षे भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. १९९० ते २००९ या २५ वर्षांच्या काळात सेना भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा हे या मतदार संघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, १ ऑगस्ट २०१४ च्या ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली.

मतदारसंघ क्रमांक – १३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसुचित जमाती


मतदारांची संख्या

पुरुष – ,३९,०७४

- Advertisement -

महिला – ,२३,३५९

एकूण मतदार – ,६२,४३३


विद्यमान आमदार – शांताराम तुकाराम मोरे

 

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनाच्या शांताराम मोरे हे २०१४ साली २, ६२, ४३३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे शांताराम पाटील यांचा ४७, ९२२ मतांनी पराभव केला होता. त्यांचे शिवसेना पक्ष बांधणीसाठी विशेष योगदान आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • शांताराम तुकाराम मोरे, शिवसेना – ५७,०८२
  • शांताराम पाटील, भाजप – ४७,९२२
  • दशरथ पाटील, मनसे – २५,५८०
  • महादेव घाटाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – २३, ४१३
  • सचिन शिंगडा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १०९२३

नोटा – २२६५

मतदानाची टक्केवारी – ६६.२३%


हेही वाचा – भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -