घरमहा @२८८वैजापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ११२

वैजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११२

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (विधानसभा क्र. ११२) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

वैजापूर हा औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. २०१४ पूर्वीच्या विधानसभा निवडणूकीपर्यंत वैजापूर विधानसभा मतदार संघावर सलग १५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघातील विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी शिवसेनेकडून आर. एम. वाणी यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर यांना शिवसेनेच्या वाणींविरुद्ध उभे केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाऊसाहेब चिकटगावकर यांचा प्रचार केला. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या वाणींचा पराभव करत शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरूंग लावला.

मतदारसंघ क्रमांक ११२
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,४४,४०६
महिला ,२९,९४२
एकूण – २,७४,३४८

- Advertisement -

विद्यमान आमदार – भाऊसाहेब रामराव पाटीलचिकटगावकर

mla bhausaheb patil-chikatgavkar.webp 1
विद्यमान आमदार – भाऊसाहेब रामराव पाटील-चिकटगावकर

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे भाऊसाहेब रामराव पाटीलचिकटगावकर हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या रंगनाथ वाणी यांचा दारूण पराभव करत वैजापूर विधानसभा मतदार संघावरील शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आणले. भाऊसाहेब रामराव पाटीलचिकटगावकर यांना वाचन आणि धार्मिक प्रवचनांची आवड आहे. वैजापूर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतात.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

) भाऊसाहेब रामराव पाटीलचिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस ५३,११४
) रंगनाथ वाणी, शिवसेना४८,४०५
) डॉ. दिनेश परदेशी, काँग्रेस४१,३४६
) एकनाथ जाधव, भाजप२४,२४३
) रामहरी जाधव, शेकाप – १२,६४८

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०७

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -