घरमहाराष्ट्रपिंपरीत-चिंचवडमध्ये टेम्पोसह १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

पिंपरीत-चिंचवडमध्ये टेम्पोसह १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

Subscribe

अमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी कामगिरी केली आहे. पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सलग कारवाई केली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केली आहे. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा चालक पिंपरी-चिंचवड परिसरतील बड्या दुकानदारांना गुटख्याचा पुरवठा करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (२९) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. हा चालक पिंपरीच्या वैभव नगरमध्ये वास्तव्यास आहे. त्याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी त्याच्याविरोधात तक्रार केली आहे.

हेही वाचा – कळंबोलीतून साडेसात लाखांचा गुटखा जप्त

- Advertisement -

अशी केली कारवाई

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी हा पहाटे साडेचारच्या सुमारास टेम्पो क्रमांक एम.एच १२ एम. व्ही. १४६३ हा भरधाव काळेवाडीहून शिवराज नगरकडे जात होता. तेव्हा गस्त घालत असलेल्या पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर जाऊन अडवले. टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये तब्बल १० लाख रुपयांचे विमल कंपनीच्या गुटख्याचे पॅकेट आढळून आले.

हेही वाचा – गुटखा विक्रीला चाप; विक्रेत्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

- Advertisement -

त्याने गुटखा कुठून आणला?

याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने येऊन पंचनामा करत चालकाला वाकड पोलिसाच्या स्वाधीन केलं आहे. याप्रकरणी फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. चालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी हा शहरातील बड्या दुकानदारांना गुटखा पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप त्याने गुटखा कुठून आणला हे समजू शकलेले नाही. त्याचा तपास वाकड पोलीस करीत आहेत. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांच्या टीमने केली आहे.


हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -