घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

पिंपरी-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

Subscribe

पिंपरी-चिंचवडच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मोठे यश. तब्बल १० लाख ८०० रुपयांचा गुटखा केला जप्त. याप्रकरणी पोलिसांनी दोन इसमांना अटक केले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल १० लाख ८०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून हा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये सुगंधी तंबाखू आणि पान मसाला यांचा मोठा साठा आहे. पोलिसांनी याप्रकरणी समीर युनूस तांबोळी (४५) आणि सचिन गंगाधर पाटील (२८) या दोन इसमांना अटक केली आहे. यामधील समीर हा थेरगावच्या पवार नगरमध्ये राहतो तर सचिन हा नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात राहतो.

हेही वाचा – कळंबोलीतून साडेसात लाखांचा गुटखा जप्त

- Advertisement -

अधिकाऱ्यांंनी अशी केली कारवाई

अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे अधिकारी रात्रीची गस्त घालत असताना त्यांना हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी चौकाजवळील हिरामण चाळ येथे दोन संशयित दुचाकी आढल्या. त्यातील एका गाडीचा क्रमांक एम.एच. १४ एफ.पी. ३४५८ असा होता. दुचाकींवर संशय येण्यामागील कारण असे की, त्यांच्यावर मोठमोठ्या बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्या गाड्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांना दुचाकींच्या बाजूला एक गोदाम दिसले. अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी ते गोदाम उघडले असता त्यात तब्बल ७ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा आढळला. दुचाकी चालकाला अमली विरोधी पथक गुन्हे शाखाचे अधिकारी श्रीराम पौळ आणि वसंत मुळे यांच्या टीम ने ताब्यात घेत त्याला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली.

हेही वाचा – गुटखा विक्रीला चाप; विक्रेत्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

- Advertisement -

चिखली पोलिसांनीही केला गुटखा जप्त

दुसरी कामगिरी चिखली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली. यात त्यांनी तब्बल २ लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. टेम्पो चालक सचिन गंगाधर पाटील हा देहू आळंदी रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक करत होता. त्याला गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांनी हटकले. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. टेम्पोमध्ये सुगंधी तंबाखू, पान मसाला यांचे पॅकेट मिळाले आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने फिर्याद नोंदवली आहे.


हेही वाचा – एफडीएची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; ८१ दुकानांना टाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -