घरमुंबईकळंबोलीतून साडेसात लाखांचा गुटखा जप्त

कळंबोलीतून साडेसात लाखांचा गुटखा जप्त

Subscribe

पनवेल: पनवेलसह रायगड गुटखा मुक्तीचा संकल्प करून पनवेल संघर्ष समितीने अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्याने उघडलेल्या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यावेळी दोन वाहनेही जप्त करण्यात आली.

मुख्तार अली असगर आणि राहुल श्रीकांत नेटकर अशी ताब्यात घेतलेल्या गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

अन्न आणि औषध प्रशासन, रायगड विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप, बाळाजी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

असगर अली याच्याकडून 2 लाख 95 हजार रुपये किंमतीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आणि 1लाख 70 हजार रुपयांचे वाहन तसेच नेटकर याच्याकडून 1,39,469 रूपयाचा पान मसाला आणि दीड लाख रुपयांचे वाहन असे सात लाख 55 हजार रुपये किंमतीची कारवाई केली आहे.

- Advertisement -

गुटखा, तंबाखूसारख्या कर्करोगाला निमंत्रण देणार्‍या अंमलीपदार्थ विक्रीला शासनाची बंदी आहे. संघर्ष समितीने गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचा संकल्प करून तरुणांना व्यसनांपासून वाचविण्याचा विडा उचलला आहे. त्यात या कारवाईमुळे यश आले आहे.
– कांतीलाल कडू, अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -