घरमहाराष्ट्रअजूनही १७ नंबरचा फॉर्म भरला नाही? तर वाचा...

अजूनही १७ नंबरचा फॉर्म भरला नाही? तर वाचा…

Subscribe

ज्या विद्यार्थ्यांचे विशेष करुन १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिला आहे त्यांना शिक्षण मंडळाने आणखी संधी दिली आहे. हे विद्यार्थी आता ३१ डिसेंबर पर्यंत फॉर्म भरु शकतात. परंतु, यासाठी त्यांना अतिविलंब शुल्क भरावा लागला आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असतो. बोर्डाच्या या परीक्षा दिल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गुणानुसार त्यांना हव्या त्या क्षेत्रात जातायेतं. यावर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शिक्षण मंडळाने दिलेला कालावधी संपला आहे. हा कालावधी दहावीसाठी ७ नोव्हेंबर २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ आणि बारावीसाठी २६ नोव्हेंबर २०१८ ते ५ डिसेंबर २०१८ असा होता. मात्र, या कालावधीतही ज्या विद्यार्थ्यांचे विशेष करुन १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिला आहे, त्यांना शिक्षण मंडळाने आणखी एक संधी दिली आहे. हे विद्यार्थी आता ३१ डिसेंबर पर्यंत फॉर्म भरु शकतात. परंतु, यासाठी त्यांना अतिविलंब शुल्क भरावा लागला आहे.

‘ही’ आहे वाढीव कालावधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने यासंबंधी एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. काही वेळा विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव परिक्षा फॉर्म भरणे राहून जाते. त्यामुळे त्यांना परिक्षा देता येत नाही. त्यांचे पूर्ण वर्ष वाया जाते. या गोष्टींचा विचार करुन शिक्षण मंडळाने ही तारीख वाढवली आहे. परंतु, यासाठी विद्यार्थ्याला आता प्रतिदिन २० रुपये असे अतिविलंब शुल्क द्यावे लागणार आहे. मंडळाने जाहीर केलेला कालावधी हा १५ डिसेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ असा आहे. या कालावधीत प्राप्त झालेले नाव नोंदणी अर्ज विहित शुल्क, अतिविलंब शुल्क आणि मुळ कागदपत्रांसह लेट फॉर्म असा शेरा लिहून ४ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क केंद्रांनी विभागीय मंडळाकडे हस्तपोहोच करावे असे आदेश शिक्षण मंडळाने दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -