घरमहाराष्ट्रनाशिकअकरावी अॅडमिशनचा फॉर्म भरला की नाही? गुरुवारी शेवटची संधी

अकरावी अॅडमिशनचा फॉर्म भरला की नाही? गुरुवारी शेवटची संधी

Subscribe

नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाकरिता दुसर्‍या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासाठी गुरुवार (ता.२९) पर्यंत मुदत असेल. या फेरीची निवड यादी ३ जुलैला सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत पहिली फेरी पार पडलेलीआहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या यादीतील विद्यार्थ्यांना काल (ता.२६) पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली होती. त्यानंतर मंगळवारी दुसर्‍या प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दरम्यान, पहिल्या प्रवेश फेरीत एकूण ८ हजार १४१ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहे. यामध्ये ७ हजार ३७९ प्रवेश हे नियमित प्रवेश फेरीतून झालेले असून, उर्वरित ७६२ प्रवेश कोट्याच्या जागांवर झालेले आहेत.

- Advertisement -

यानंतर पुढील प्रवेश फेरीसाठी १५ हजार २४३ जागा रिक्त असून, कोट्याच्या ३ हजार ४९६ जागा अशा एकूण १८ हजार ७२९ जागा रिक्त आहेत. दुसर्‍या फेरीसाठी नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झालेली आहे. याअंतर्गत यापूर्वी नोंदणी केलेली नसलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक व दोन भरता येणार आहे. यापूर्वी नोंदणीकृत व अर्जाचा भाग एकचे प्रमाणिकरण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरतांना सुधारित पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. पसंतीक्रम नोंदविल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करणे अपेक्षित आहे.

दुसर्‍या प्रवेश फेरीचे वेळापत्रक असे
  • ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत : २९ जून
  • कोट्याच्या जागांसाठी प्रवेश : ३० जून ते २ जुलै
  • दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्धी : ३ जुलै
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत : ३ ते ५ जुलै
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -