घरमहाराष्ट्र150 वर्ष जुन्या 'मोहोर'चे दसरा मुहूर्तावर होते पूजन; BMCची परंपरा

150 वर्ष जुन्या ‘मोहोर’चे दसरा मुहूर्तावर होते पूजन; BMCची परंपरा

Subscribe

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर एका खास यंत्राद्वारे ‘मोहोर’ उमटविली जाते. ही खास मोहोर उमटविली जाते एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्रा वापरली जाते. ही यंत्रणा तब्बल दीडशे वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. महानगरपालिकेतील प्रथेनुसार या यंत्राचे दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशीही माहिती या निमित्ताने महानगरपालिका सचिव (प्र.) संगीता शर्मा यांनी दिली आहे.

महानगरपालिका इमारत संपूर्ण भारतीयांसाठी आजही सर्व सामान्य लोकांमध्ये एक आकर्षण आहे. या इमारतीची बांधणी ब्रिटिशकालीन आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून महानगरपालिकाच्या इमारतीचे सौंदर्य अबाधित असून येथे अनेक आश्चर्यकारक आणि कुतूहल वाढविणाऱ्या बाबींचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा आहे. याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आतापर्यंतचे महापौर आणि आयुक्त यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत.

- Advertisement -

मुंबईतील प्रत्येक विकासकामे, त्यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा आणि कागदोपत्री कामकाजही जबाबदारीचे असते पण या सर्व निविदा आणि कागदपत्रे यांच्यावर जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेची एक खास ‘मोहोर’ उमटत नाही. तोपर्यंत कोणतेही कंत्राट अंतिम (Final) होत नाही. ही खास मोहोर उमटविली जाते एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्रा वापरली जाते. ही यंत्रणा तब्बल दीडशे वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. जेव्हा मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर याच ऐतिहासिक यंत्राद्वारे मोहोर उमटविली जाते. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रत्येक कंत्राटाची अंतिम रक्कम अदा करण्यापूर्वी त्यावर या यंत्राद्वारे मोहोर उमटविणे आवश्यक आहे. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने या यंत्राचे पूजन केली जाते.

हेही वाचा – भाजपा 10 वर्षांपासून केंद्रात, पण…; मराठा आरक्षणावरून नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

- Advertisement -

कामगदत्रांवरील लिखाण, त्यावरील शेरे, शिक्केंना खूप अर्थ

मोहर उमटवण्याची यंत्रणेद्वारे मुंबईकरांचे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, सुरक्षा, रस्ते आरोग्य आदी विविध नागरी सेवा सुविधांसह अनेक पायाभूत सुविधांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून सेवेत आहे. या यंत्रणेने महानगरपालिका प्रशासनाला अनेकदा लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात. त्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका प्रशासनाच्या विविध कागदपत्रांना खूप महत्त्व असते. त्यामुळे या कामगदत्रांवरील लिखाण, त्यावरील शेरे, शिक्के यांनाही खूप अर्थ असतो.

हेही वाचा – Dussehra Gathering: दसरा मेळाव्यातून राजकीय ताकद दाखविण्यासाठी नेते सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात

मोहोर उमटवलेल्या यंत्रणेचा असा आहे इतिहास 

बृहन्मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनचे महत्त्वाचे दस्तावेज आजही महानगरपालिकेच्या सचिव विभागाने जपून ठेवले आहेत. यानुसार सन 1873 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या इतिवृत्तापासून अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश आहे. सचिव कार्यालयातील जुन्या कपाटांमध्ये हा अमूल्या ठेवा. यात गेल्या दीडशे वर्षांपासून जपून ठेवण्यात आला आहे. या मौल्यवान ठेव्यातील अनेक कागदपत्रांवर एक मोहोर उमटलेली आपल्याला दिसते. ती मोहोर गेल्या दीडशे वर्षांपासून ज्या ‘सील’ यंत्राद्वारे उमटवली जाते. ते यंत्र सन 1874 मध्ये लंडन येथे तयार करण्यात आले असून हे यंत्र अतिशय भक्कम आणि पूर्णपणे लोखंडापासून बनवण्यात आले आहे. त्याद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांवर मोहोर उमटविली जाते. विशेष बाब म्हणजे जोपर्यंत ही मोहोर उमटत नाही. तोपर्यंत या कागदांना काहीच अर्थ नसतो. या यंत्राचे अनेकांना अप्रुप असून महानगरपालिका सचिव (चिटणीस) विभागात हे यंत्र गेली तब्बल दीडशे वर्ष अव्याहतपणे कार्यरत आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्याला येताना ‘या’ गोष्टी आणू नका; ठाकरे गटाकडून आवाहन

मोहोर उमटवण्याची यंत्रणा असे करते काम

महानगरपालिकेच्या सचिव (चिटणीस) कार्यालयातील ‘सील’ यंत्र ब्रिटिशकालीन असून त्याची बनावटही पुरातन आहे. लोखंडापासून तयार केलेले हे यंत्र एका मोठ्या लाकडी टेबलावर बसविण्यात आले आहे. हे यंत्र वापरताना सुरुवातीला एका मोठ्या लोखंडी तुळईचा वापर करण्यात येतो. या तुळईच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे दोन मोठे गोळे जोडलेले आहेत. अत्यंत वजनदार असणारी ही तुळई यंत्राच्या वरती ठेवण्यात येते. यानंतर या यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या छोट्याच्या लोखंडी फटीत ज्यावर मोहर उमटवायची ते महत्त्वाचे कागदपत्र ठेवली जातात. त्यावर यंत्राच्या वर ठेवण्यात आलेली वजनदार लोखंडी तुळई उजवीकडून डावीकडे फिरविली जाते. ज्यामुळे लोखंडी फटीचे दोन्ही लोखंडी भाग एकमेकांवर दाबले जातात आणि कागदावर ठसठशीत मोहोर उमटते.

गेल्या दीडशे वर्षांपासून हे यंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत अविरतपणे कार्यरत असून, त्याद्वारे अनेक महत्त्वाच्या ऐवजांवर ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रथेनुसार या यंत्राचे दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशीही माहिती या निमित्ताने श्रीमती संगीता शर्मा यांनी दिली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -