घरमहाराष्ट्रभाजपा 10 वर्षांपासून केंद्रात, पण...; मराठा आरक्षणावरून नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपा 10 वर्षांपासून केंद्रात, पण…; मराठा आरक्षणावरून नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

मुंबई : गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. पण आजपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला आला नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मराठा आरक्षणावरून सरकारमधील मंत्र्यांमध्ये एक वाक्यता दिसत नाही आणि ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजित सरकार जबाबदार आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात नाना पटोले म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून कोणी रोखले नाही. केंद्रात 10 वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही आणि कोणात निर्णय देखील घेतला नाही?, असा सवाल नाना पटोलेंनी केले आहे. पुढे नाना पटोले म्हणाले, “केंद्र सरकारने मागच्या महिन्यात ससंदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. यात केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 50 टक्के काढण्याचा निर्णय घेतला असता. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता.”

- Advertisement -

हेही वाचा – दसरा मेळाव्याला येताना ‘या’ गोष्टी आणू नका; ठाकरे गटाकडून आवाहन

एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे चुकीचे आहे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. अजित पवारांची भूमिका ही योग्य असल्याचे नाना पटोलेंनी म्हटले. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एक बोलत आहेत तर उपमुख्यमंत्री दुसरेच बोलतात. यामुळे राज्य सरकारमध्ये नेमके काय सुरू आहे हे कळण्यास मार्ग नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. तेव्हाच मराठा आरक्षण मार्गी लागेल, असे नाना पटोलेंनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Dussehra Gathering: दसरा मेळाव्यातून राजकीय ताकद दाखविण्यासाठी नेते सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात

बिअरचे दर कमी करण्यासाठी शिंदे सरकारने नेमली समिती 

छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी (22 ऑक्टोबर) 250 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहे. या ड्रग्ज प्रकरणावर नाना पटोले म्हणाले, “गुजरातमधील मुंदा बंदरात तीन-चार वेळा कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. ही ड्रग्ज खाजगी बंदरांमध्ये सापडली आहेत. भाजपा सरकार हे तरुणांना ड्रग्ज आणि बिअर उपलब्ध करू देत आहे. यामुळे आताची तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. आता शिंदे सरकारने बिअरच्या किमती कमी करण्यासाठी एक समिती नेमली असून हे सरकार उद्या राहिले तर रेशनवरही बिअर मिळेल. मग पाण्याच्या जागी बिअर प्यावी, असेही धोरण शिंदे सरकार आणणार की काय? असा सवाल उपस्थित करून नाना पटोलेंनी भीती व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -