घरमहाराष्ट्रमुंबई IIT ला चक्क 160 कोटी रुपयांची देणगी; दानशूराचे मात्र नाव अंधारात

मुंबई IIT ला चक्क 160 कोटी रुपयांची देणगी; दानशूराचे मात्र नाव अंधारात

Subscribe

विशाखापट्टणममधील सिम्हाचलम मंदिरात एका भाविकांने त्याच्या श्रद्धपोटी देवस्थानाला शंभर कोटी रुपये देऊ केल्याचा धनादेश दानपेटीत टाकला होता. मात्र, ही देणगी खोटी, फसवी होती.

मुंबई : दक्षिण भारतातील विशाखापट्टणममधील सिम्हाचलम मंदिरात एका भाविकांने त्याच्या श्रद्धपोटी देवस्थानाला शंभर कोटी रुपये देऊ केल्याचा चेक मिळून आला पण त्याच्या खात्यात होते ते 22 रुपये. या खोट्या दानाची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईतही भल्या मोठ्या दानाची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुंबई IIT ला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 160 कोटी रुपये दान म्हणून दिले असून, त्याचे नाव अद्याप पुढे आले नाही हे विशेष.(160 crore donation to Mumbai IIT; But the name of Danshura is in darkness)

विशाखापट्टणममधील सिम्हाचलम मंदिरात एका भाविकांने त्याच्या श्रद्धपोटी देवस्थानाला शंभर कोटी रुपये देऊ केल्याचा धनादेश दानपेटीत टाकला होता. मात्र, ही देणगी खोटी, फसवी होती. एकीकडे या दानाच्या वृत्ताची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे मुंबईतील आयआयटी या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 160 कोटी रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या देणगीमुळे आयआयटी मुंबई सध्या चांगलीच चर्चेत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादीचे गोलमाल! शरद पवार म्हणतात- पक्षात फूट नाही; वेगळी भूमिका घेतलेल्यांना पुन्हा संधी नाही

नीलकणी यांनी केले होते 315 कोटी रुपये दान

मागील काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी (IIT) मुंबईला 315 कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत शिक्षणासाठी 50 वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्यानिमित्ताने ही रक्कम दान केली होती. मात्र आज आयआयटी मुंबई पुन्हा एकदा दानामध्ये मिळालेल्या रकमेमुळे चर्चेत आहे. यावेळी संस्थेला जवळपास 160 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. मात्र ही देणगी अज्ञात व्यक्तीकडून मिळालेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  : देवाने आशीर्वाद दिला म्हणजे…; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी मानले आभार

यासाठी वापरली जाणार ही देणगी

ही रक्कम ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबच्या स्थापनेसाठी उभारली जाणार असल्याची माहिती आयआयटीचे सुभासिस चौधरी यांनी दिली आहे. ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबची स्थापना आधुनिक तंत्रज्ज्ञाच्या सहाय्याने हवामानात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केली आहे, असे सुभासिस चौधरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -