घरमहाराष्ट्रअग्निशमन सेवा शुल्क न भरणाऱ्या बिल्डरांना आता १८ टक्के पेनल्टी

अग्निशमन सेवा शुल्क न भरणाऱ्या बिल्डरांना आता १८ टक्के पेनल्टी

Subscribe

इमारत उभारणी करणाऱ्या बिल्डरांनी अग्निशमन सेवा शुल्क न भरल्यास अशा बिल्डरांना आता अग्निशमन दलाकडून १८ टक्के पेनल्टी लावण्यात येणार आहे.

मुंबई : इमारत उभारणी करणाऱ्या बिल्डरांनी अग्निशमन सेवा शुल्क न भरल्यास अशा बिल्डरांना आता अग्निशमन दलाकडून १८ टक्के पेनल्टी लावण्यात येणार आहे. अग्निशमन दलाने २०१५ पर्यंतच्या इमारती बनविणाऱ्या काही बिल्डरांना यासंदर्भात नोटिसा पाठवून अग्निशमन सेवा शुल्क भरण्यास फर्मावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (18 percent penalty now for builders who do not pay fire service charges)

मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील ज्या बिल्डरांनी अग्निशमन सेवा शुल्क भरले नाही, अशा बिल्डरांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. २०१५ पर्यंत अग्निशमन दलाला सेवा शुल्क न भरलेल्या बिल्डरांनी जर वेळेत शुल्क न भरल्यास त्यांना १८ टक्के पेनल्टी लावण्यात येणार आहे.

- Advertisement -

वास्तविक, अग्निशमन दलाने २०१४ ते २०२१ या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरांकडून अग्निशमन सेवा शुल्क वसुली करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. हे शुल्क निर्माण करण्यात आलेल्या इमारतीच्या उंचीवर आधारित असते. तसेच, २०२२ मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नवीन इमारतीचा सेवा शुल्क भरलेला आहे की नाही, याची झाडाझडती सुरू असून बिल्डरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सेवा शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे.

जर बिल्डरांनी वेळेत शुल्क न भरल्यास त्यांना शुल्क व १८ टक्के पेनल्टी लावण्यात येणार आहे. सध्या २०१५ पर्यंतच्या इमारतींना ज्यांनी सेवा शुल्क भरलेले नाही, त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर २०१६ ते २०२१ पर्यंतच्या इमारतीचा शोध घेऊन अग्निशमन सेवा शुल्क न भरणाऱ्या इमारतींच्या बिल्डरांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, असे सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ‘ट्रू लाइफ सेव्हर्स’ मोटरमननी वाचवले 12 जणांचे जीव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -