घरठाणेसरकारची दोन कोटींना फसवणूक

सरकारची दोन कोटींना फसवणूक

Subscribe

पुणे-बडोदा महामार्ग भूसंपादन प्रकरण

कल्याण । बल्याणी गावातून पुणे बडोदा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गात येथील शेत जमीन व निवासी घरे येत असल्याने शासनाने भूसंपादन करीत संबंधितांना नुकसान भरपाई बदल्यात लाखो रुपयांची देणी दिली होती. मात्र बल्याणीतील एका भामट्याने बांधकामाचे खोटे दसतऐवज बनवीत उपविभागीय कार्यालयाकडून दोन कोटी 8 लाख साठ हजार रक्कम उकळत फसवणूक केल्याची तक्रार उघडकीस आली आहे.

टिटवाळा नजीक असलेल्या बल्याणी या गावातील सर्व्हे नंबर तीन चार ही जमीन पुणे बडोदा महामार्गाच्या प्रकल्पात गेली आहे. मात्र या जमिनीवर तक्रारदार मोहम्मद मिठाईवाला यांच्या नावावर कोणतेही बांधकाम झाले नसताना पुरवणी निवाडा यादी कल्याण उपविभागीय कार्यालयाने एक वर्षापूर्वी नाव घोषित करीत बनावट संमत्ती पत्राच्या आधारे साजिद शरफुद्दीन रईस यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचे निवेदन कल्याण उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहे. या निवेदनात मिठाईवाला यांनी म्हटले आहे की प्रत्यक्षात सर्व्हे नंबर 3 आणि 4 वर चाळीचे बांधकाम अस्तित्वात नसून संचिकेचे अवलोकन केले असता मोबदला मागणीबाबत माझे नाव माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे मिठाईवाले यांनी स्पष्ट केले आहेत.

- Advertisement -

या अनुषंगाने बल्याणी गावातील साजिद रईस याने संचिकेत जोडलेले संमती पत्र ,विकसित करारनामा ,बनावट सही तसेच या जागेवर चाळीचे बांधकाम दाखवण्याचे उघड झाले आहे. या जागेवरील चाळ अस्तित्वात नसतानाही मोहम्मद मिठाईवाला यांच्या नावावर असल्याचे भासवीत शासनाकडून दोन कोटी आठ लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबतची तक्रार कल्याण उपविभागीय अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. आपल्या नावे असलेला निवाडा तातडीने रद्द करून अपहार करण्यात आलेली रक्कम शासन दरबारी जमा करून दोषी इसमांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मोहम्मद मिठाईवाले यांनी केली आहे. याबाबत कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना याबाबत विचारणा केली असता या तक्रारी संदर्भात सुनावणी आदेश पारित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं महानगरचे वृत्त खरे ठरले!
आपलं महानगर ने 25 नोव्हेंबरच्या अंकात ‘मोबदल्यासाठी नव्याने शेडची बांधकामे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. बल्याणी गावातील गावकर्‍यानेच सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याने कल्याण उपविभागीय कार्यालय सतर्क झाले आहे. याबाबत तक्रारी आल्यास फसवणूक करणार्‍यांवर कारवाईची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -