घरताज्या घडामोडीपुणे : वडापावच्या गाडीवरुन वाद; २२ वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : वडापावच्या गाडीवरुन वाद; २२ वर्षीय तरुणाची हत्या

Subscribe

क्षुल्क कारणांवरुन एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. भाजप नगरसेविकेच्या मुलाने या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुभम नखाते असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, भाजप नगरसेविकेचा मुलगा फरार असल्याची माहिती समोर आली असून सध्या त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

वडापावच्या गाडीवरुन झालेल्या वादात या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या शुभम नखाते आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी वडापावच्या गाडीवरुन वाद निर्माण झाला होता. त्यातून अनेकदा त्यांची किरकोळ भांडणे देखील झाली होती. दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी शुभमने आरोपी ज्ञानेश्वरला पाटील याला जीवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

त्यानंतर ज्ञानेश्वरने आपल्या पाच साथीदारांना याबाबत सांगितले. हे प्रकरण त्याभागातील भाजप नगरसेविका सुनिता तापकीरांचा मुलगा राजपर्यंत पोहचले. त्यामुळे राज तापकीर याने हे प्रकरण शांत करण्यासाठी शुभम नखातेला फोन केला आणि प्रकरण शांत करण्यासाठी बोलावून घेतले.

दरम्यान, राज तापकीर आणि शुभम नखाते हे पाहुणे असल्याने शुभमच्या मनात कोणती शंका उपस्थित झाली नाही. त्यामुळे शुभम रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धोंडिराज मंगल कार्यलयात आला. मात्र, तिथे आल्यानंतर पुन्हा वाद झाला आणि शुभमवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या झाल्यानंतर तत्काळ वाकड पोलिसांनी ही हत्या करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत इतर दोघांना असे एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इंदोरीकर महाराज प्रकरण : अनिसकडून हस्तक्षेप अर्ज दाखल, पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -