घरठाणेठाण्यात चोरट्यांनी पळवली पालिकेच्या रुग्णवाहिकेची बॅटरी

ठाण्यात चोरट्यांनी पळवली पालिकेच्या रुग्णवाहिकेची बॅटरी

Subscribe

ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णवाहिकेची बॅटरी चोरटयांनी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बॅटरी चोरी करणाऱ्या चोराचा कसून शोध घेण्यात येत आहे.

ठाणे महानगर पालिकेची एमएच ०४ ईपी ७७५ हा क्रमांक असलेल्या रुग्णवाहिकेवरील चालक दिगंबर पर्वत याने १८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णवाहिका बस ठाणे महानगर पालिका चौक, कल्याण ज्वेलर्स दुकानासमोर पार्क करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चालक दिगंबर पर्वत हे रुग्णवाहिकेवर आले असता त्यांना रुग्णवाहिका असलेल्या बसची बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

त्याने ताबड्तोब महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याच्या लक्षात हि बाब आणून दिली. दरम्यान महानगर पालिकेच्या संबंधित अधिकारी यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन रुग्णवाहिका बसची पाहणी केली असता अज्ञात चोरटयांनी सर्व वायरी तोडून रुग्णवाहिका असलेल्या बसमधील बॅटरी चोरी केल्याचे उघडकीस आले. चोरीला गेलेल्या बॅटरीची किंमत १० हजार रुपये असून या चोरी प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अजित चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्यात मागील काही महिन्यापासून चोरीच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झालेली आहे, वाहन चोरी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घडफोडी सारखे गुन्हे सर्रासपणे सुरु असून या चोरटयांनी आता सरकारी वाहनाना देखील सोडलेले नाही. ठाणे पोलिसाचा गुन्हेगारावरील वचक राहिलेला नसल्यामुळे गुन्हेगारांना रान मोकळे झाल्याची चर्चा ठाणेकरामध्ये सुरु आहे.


Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -