घरमुंबईGaneshotsav 2020: कोरोनामुळे मीरा-भाईंदरमध्ये गणेश मूर्तींची होम डिलिव्हरी

Ganeshotsav 2020: कोरोनामुळे मीरा-भाईंदरमध्ये गणेश मूर्तींची होम डिलिव्हरी

Subscribe

मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे समस्त मूर्तिकारांनी ऑनलाईन बुकिंग व बाप्पांची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. २२ ऑगस्टपासून सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे घरी आगमन होणार आहे याकरता घरांमध्ये सजावटीला वेग आला आहे. यात आता आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मूर्तिकार यांच्याकडून ऑनलाईन बुकिंग व घरपोच सेवा अशी व्यवस्था सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे.

कोरोना महामारीचा काळ असल्याने व उशिरा महापालिकेनी परवानगी दिल्याने लोकांना तातडीने सुविधा मिळावी म्हणून आमच्या मूर्तीकार संघाकडून ऑनलाईन बुकिंग व घरपोच सेवा देण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निखील तावडे, मूर्तीकार

मूर्तिकार संघाचे अध्यक्ष मूर्तिकार सचिन पाटील यांच्यासह निखिल तावडे, योगेश लाड व पराग म्हात्रे या सर्व मूर्तिकार कारखानदारांनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश मूर्तींच्या फोटो, उंची व किंमत जाहीर केली आहे. त्यावरून पसंद आलेली मूर्ती ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर मूर्ती थेट घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. बुधवारी रात्रीपासून गणपती बाप्पांना घरी पोचवण्यास सुरुवातदेखील झाली आहे. त्यामुळे भक्तांमध्येही आता उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे.


Photo: गणपती बाप्पाला घरी आणताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -