घरमहाराष्ट्रराज्यात सापडले २३२ करोनाबाधित

राज्यात सापडले २३२ करोनाबाधित

Subscribe

राज्यात करोनारुग्ण २९५ बरे होऊन घरी

राज्यात बुधवारी २३२ नवे करोनारुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २९१६ इतकी झाली असून आतापर्यंत १८७ करोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात बुधवारी बळी गेलेल्या ९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात २९५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.

तर करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत बुधवारी १८३ नवे रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबई एकूण ११४ जण बळी गेले आहेत. तर ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात करोनाचे १७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या ठाण्यातील १४ नवीन रूग्णांचा समावेश आहे . त्यामुळे ठाणे मंडळात करोनाबाधितांची संख्या ३३४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

बुधवारी राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूंपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत. तर ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२,००० नमुन्यांपैकी ४८,१९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५३९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -