घरCORONA UPDATEकोरोनामुळं ३ सख्ख्या भावांचा मृत्यू! कुटुंबातील १८ सदस्यांनाही लागण!

कोरोनामुळं ३ सख्ख्या भावांचा मृत्यू! कुटुंबातील १८ सदस्यांनाही लागण!

Subscribe

मुंबईबरोबरच पुण्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पुतण्याला कोरोनाची लागण झाली, याचा धक्का लहानग्या भावाला बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर यातून स्वतःला सावरु न शकलेल्या दोघा भावांचा ही मृत्यू झाला. ६१, ६६ आणि ६३ अशी तिघांची वय होती.

या तिघांच्या कुटुंबातील १८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतर सर्वांनी कोरोनावर मात केली पण हे तिघे सख्खे भाऊ मात्र यातून वाचू शकले नाहीत. तिघांना आधी वेगवेगळे आजार ही होते. जुलैच्या सुरुवातीलाच कुटुंबातील मुलाला कोरोनाची लक्षणं आढळू लागली. त्यामुळे ४ जुलैला मुलाचे नमुने देण्यात आले. तर ६ जुलैला मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याचे एकत्रीत कुटुंब होते. मुलाला कोरोना झाल्याचे सहन न झाल्यामुळे वडील आणि काकांनाही याचा धक्का बसला. कुटुंबातील इतर १७ सदस्यांची कोरोना चाचणी करण्.त आली. यात सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सर्वांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

पुतण्याला कोरोना झाल्याचे कळताच घरातील पॅरालिसीस असलेल्या भावाची तब्येत आणखी खालावली व त्यांचे निधन झाले ते ६१ वर्षांचे होते. आपला लहान भाऊ असा अचानक गेल्यामुळे मोठे दोन्ही भाऊ खचले या दोघांनाही हृद्यविकाराचा त्रास होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी मात्र कोरोनावर यशस्वी मात केली.


हे ही वाचा – सुशांतसिंग राजपूत वर सिनेमा, ‘सुसाईड ऑर मर्डर?’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -