घरमहाराष्ट्रमहावितरणच्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा कवच

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा कवच

Subscribe

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माहिती दिली

राज्यातील सुमारे २ कोटी ६० लाख ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ३० लाख रुपयांचे विमा संरक्षण पुरविण्यात आले आहे. नियमित कर्मचाऱ्यांसह महावितरणामध्ये संचालन आणि दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत सुरक्षा रक्षकांनाही विमा संरक्षणाचा लाभ देण्याचा देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे अभिंयते, कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्य सरकार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अशावेळी बहुतांश नागरिक घरातच थांबून आहेत. अशा घरात राहणाऱ्या नागरिकांना आणि घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणाने २४ तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. याद्दष्टिने महावितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनायोध्दे ठरतात. कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून विमा संरक्षण पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जवाटपासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन


महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी याशिवाय कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षकांना हे विमा संरक्षण लागू राहणार आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोविड-१९ विषाणूने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय, पालिका, महानगरपालिका आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. हे विमा संरक्षण मिळण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबतच्या अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. राऊत व महावितरणचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -