घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र३३०० कोटींची गुंतवणूक, महिंद्राची गुंतवणूक वाढ ते पांजरपोळ; उद्योगमंत्री सामंत यांनी दिली...

३३०० कोटींची गुंतवणूक, महिंद्राची गुंतवणूक वाढ ते पांजरपोळ; उद्योगमंत्री सामंत यांनी दिली नाशिकला खुशखबर

Subscribe

नाशिक : रिलायन्स फार्मा पाठोपाठ आता पिरामल ग्रुपही नाशिकमध्ये १२०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार त्यामुळे रिलायन्स आणि पिरामल ग्रुप या दोन बडया उद्योगांच्या माध्यमातून नाशिकमध्ये सुमारे ३३०० कोटी रूपयांची गुंतवणूक भविष्यकाळात होणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. नाशिक येथे आयोजीत परिषदेप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. या दोन बडया उद्योगांमुळे नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठी कलाटणी मिळणार असून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे.

गेल्या पंधरा वीस वर्षात नाशिकमध्ये एकही मोठा प्रकल्प आला नसल्या कारणाने युवा वर्ग नोकरीच्या शोधार्थ मोठया प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. सातपूर आणि अंबड प्रमुख औद्योगिक वसाहत आहे. मात्र उद्योगांना जागा नसल्याने नाशिकचा औद्योगिक विकास खुटंला होता. सिन्नरचे सेझ बंद पडले आहे. यामुळे नाशिकला थोडेफार कृषी प्रक्रिया वगळता नवीन गुंतवणूक येत नाहीत. मात्र आता दिंडोरीतील तळेगाव अक्राळे, मालेगाव येथे साडे तीनशे एकर, राजुर बहुला येथे अडीचशे एकर जागेवर औद्योगिक क्षेत्र विकसीत होत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गुंतवणूकीस मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाने यापूर्वी नाशिकमध्ये तळेगाव अक्राळे येथे 2100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार एमआयडीसीने रिलायन्स उद्योग समूहाला 160 एकर भुखंडही ताब्यात दिला आहे.

- Advertisement -

रिलायन्स उद्योग समूहाची रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड याठिकाणी लस व औषधे निर्मिती करणार आहे. त्यात प्रामुख्याने प्राणी व माणसांना लागणारे प्रथिने, प्लाझ्मा थेरपीची औषधे यांचे उत्पादन करून त्याची निर्यात केली जाणार आहे. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही गुंतवणुकीची घोषणा केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पिरेशनला 50 एकर भूखंड ताब्यात दिले आहेत. या पाठोपाठ पिरामल ग्रुपही नाशिकमध्ये १२०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

महिंन्द्रा नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींचा प्रकल्प

महिंद्रा इलेक्ट्रिकल्स ईव्ही क्षेत्रांमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. मध्यंतरी महिंन्द्राचा प्रकल्प नाशिक ऐवजी पुणे येथे होणार असल्याच्या वृत्ताने उद्योजकांनी नाराजी दर्शवली होती मात्र मंगळवारी नाशिक दौर्‍यादरम्यान सामंत यांनी मंहिंन्द्रा नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींचा प्रकल्प विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पांजरापोळ जागेबाबत अहवालानंतर बोलू

पांजरापोळ जागेवरील औद्योगिक आरक्षणावरुन सध्या शहरात वाद सुरु आहेत. येथील ८२५ एकर जागेवर आद्योगिक क्षेत्रासाठी भूखंड संपादन करण्याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची एक समिती नियुक्त केली आहे. याबाबत विचारले असता सामंत म्हणाले, पांजरापोळच्या जागेवर किती गायी आहेत, त्यांना आवश्यक जागा किती, त्यांना अजून काय सुविधा देता येतील आवश्यक, अत्यावश्यक बाबी या मुददयांवर अभ्यास करून निर्णय घेऊ अद्याप मला प्रशासनाचा अहवाल प्राप्त झालेला नाही अहवाल आल्यानंतर याबाबत बोलू असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -