घरताज्या घडामोडीCIDCO : खूशखबर! सिडकोतर्फे तळोजा, द्रोणागिरीत 3,322 घरे विक्रीसाठी उपलब्ध

CIDCO : खूशखबर! सिडकोतर्फे तळोजा, द्रोणागिरीत 3,322 घरे विक्रीसाठी उपलब्ध

Subscribe

नवी मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळातर्फे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर 26 जानेवारी 2024 रोजी महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 चा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत तळोज्यातील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएलच्या सान्निध्यात 3,322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात झाली आहे.

विमानतळ, अटल सेतूच्या किनारी घ्या हक्काचे घर!

सिडको महामंडळातर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याकरिता सातत्याने गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. परवडणाऱ्या दरातील सदनिकांसह दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधांनी परिपूर्ण व नवी मुंबईच्या विकसित नोडमधील गृहसंकुले, या वैशिष्ट्यांमुळे सिडकोच्या आजवरच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरल्या आहेत.

- Advertisement -

महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 करीता अर्ज नोंदणी ते सोडती दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या सुलभ व पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून 26 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. योजनेची संगणकीय सोडत 19 एप्रिल 2024 रोजी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई मेट्रोजवळील तळोजा आणि भारतातील सर्वात लांब सी लिंक MTHL ला जोडणाऱ्या द्रोणागिरी नोड येथील सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 मध्ये नोंदणी करून घर खरेदी करण्याच्या या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 सादर केली आहे. या योजनेअंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण घटकांतील नागरिकांसाठी 3,322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– अनिल डिग्गीकर
व्यवस्थापकीय संचालक, सिडको

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाना संधी

3,322 सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील 61 व तळोजा नोड येथील 251 याप्रमाणे 312 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत, तर द्रोणागिरी येथील 374 व तळोजा येथील 2636 याप्रमाणे 3010 सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. योजनेच्या ऑनलाइन नोंदणी व सविस्तर माहितीकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणी सहाय्यासाठी नागरीकांनी 7065454454 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा : BMC : राज्य सरकारकडून महापालिकेला थकीत 13 हजार कोटींपैकी दमडीही मिळेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -