घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार ०७ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार ०७ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – वैर करण्यात फायदा नसतो. परिस्थिती समजावून घ्या. घाईत मत व्यक्त करणे सभ्यपणाचे ठरणार नाही.
वृषभ – मनाप्रमाणे काम करून घेता येईल. वरिष्ठांना राजी करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आर्थिक उलाढाल शक्य होईल.
मिथुन – घरगुती कामे करून घेण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. आशादायक परिस्थिती तयार होईल.
कर्क – शत्रूला कमी न लेखता तुमचे हित साधावे लागेल. अहंकार ठेवू नका. सरळ बोला व वागा. प्रेमाने मार्ग निघेल.
सिंह – धंद्याला तेजी येईल. व्यवसायाचा जम बसवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल. घरातील समस्या सोडवता येईल.
कन्या – मनची चंचलता होईल. आपले मत व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करता येईल. धंद्यात नवे काम मिळेल.
तूळ – तुमचे मत इतरांवर लादता येणार नाही. हट्टीपणाने वागून गैरसमज होऊ शकतो. वाहन जपून चालवा.
वृश्चिक – डावपेच यशस्वी होतील. ज्येष्ठ व्यक्तीची संकटात मदत होईल. धंद्यातील अंदाज बरोबर येईल. फायदा घ्या.
धनु – अतिरेक केल्यास जुळत आलेले काम फिसकटू शकते. लोक तुम्हाला मानाची वागणूक देतील.
मकर – अडचणीवर मात करता येईल. जिद्द ठेवा. कुणालाही दुखवू नका. प्रेमाच्या बोलण्याला फसू नका.
कुंभ – आप्तेष्ठांच्या भेटीगाठीत यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. धंद्यात सुधारणा करता येईल.
मीन – रेंगाळलेले काम मार्गी लावता येईल. अधिकारी वर्गाशी ओळख होईल. धंद्यात वाढ करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -