घरमहाराष्ट्रभरधाव कारची बैलगाड्यांना धडक, एक मजूर आणि बैलाचा जागीच मृत्यू

भरधाव कारची बैलगाड्यांना धडक, एक मजूर आणि बैलाचा जागीच मृत्यू

Subscribe

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे राहणारे ते निवासी होते.

बारामतीच्या इंदापूरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या उसतोड मजूराचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हे ऊसतोड करणारे हे मजूर ४ बैलगाड्या घेऊन एका गावातून दुसऱ्या गावाता जाता होते. बारामतीच्या इंदापूर राज्य महामार्गावर भरधाव ट्रकने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक बैलाली आपले प्राण गमवावे लागले.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे राहणारे ते निवासी होते. पहाटे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या घेऊन बेलवाडी ते थोरातवाडी परिसरातीस ऊस तोडणी करण्यासाठी निघाले होते. मजूर बैलगाडी घेऊन बेलवाडी पर्यत पोहचताच अचानक एका भरधाव कारने बैलगाड्यांना धडक दिली. बेलवाडी ओढ्यावरील पुलावर हा भीषण अपघात झाला. कारने धडक देताच बैलगाडी महामार्गावरून खाली फेकली गेली. यात एक उसतोड मजूर आणि एका बैलचा जागीच मृत्यू झाला. तर त्यातील चार बैल गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

आपल्या रोजच्या कामासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या उसतोड मजूरांवर काळाने घात केला. महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित उपचारांसाठी पाठविण्यात आले. या अपघाताप्रकरणी कार चालक नामदेव कांबळे वर पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – BHR घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत? खडसे पत्रकार परिषदेत कोणता बॉम्ब फोडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -