घरCORONA UPDATELive Update: पवईच्या म्हाडा कॉलनीत भीषण आग

Live Update: पवईच्या म्हाडा कॉलनीत भीषण आग

Subscribe

दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या, या लाईव्ह ब्लॉगद्वारे...

नागपूरातून एक ‘फॉरेन्सिक’ चमू आनंदवनात होणार दाखल

डॉक्टर शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमार्टमसाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आमटे यांनी आत्महत्या कशी केली. यासंदर्भात पुरावे शोधण्याकरता चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे हे आनंदवनात दाखल झाले आहेत. तर नागपूरातून एक ‘फॉरेन्सिक’ चमू आनंदवनात दाखल होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

- Advertisement -

डॉ. शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमार्टमसाठी दाखल

डॉक्टर शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमार्टमसाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे. आज सकाळी विष प्राशन करत डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली, असे सांगतिले जात आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आमटे यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. (सविस्तर वाचा)


ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव याचं वृद्धोपकाळाने निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. मराठा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष देखील होते.


देवदिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर

अयोध्येतील दिवाळीनंतर आता उत्तर प्रदेश सरकार वाराणसीत देव दिवाळीचं भव्य आयोजन करण्याच्या तयारीत आहे. पुणे दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देव दिवाळीच्या निमित्ताने वाराणसीत उपस्थित राहणार आहेत. देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये उपस्थित राहणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की, यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने ११ लाख दिवे वाराणसीत लावण्यात येणार आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप सुरू आहे. गेल्या २४ तासात देशात गेल्या २४ तासात ३८,७७२ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत बाधितांचा आकडा ९४ लाख ३१ हजार ६९२ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४४३ जणांचे प्राण कोरोनामुळे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४५ हजार ३३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.


बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सहाययक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण येथे गोळीबार करण्यात आला. दरोड्याचा तपासासाठी गेले असता हा गोळीबार झाला असल्याचे सांगितले जात आहे. फलटण तालुक्यातील वडले गावात हा गोळीबार झाला असून गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, फलटण पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. ”किरण माहेश्वरी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवेसाठी समर्पित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.” असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.


लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या दुपारी साडेबारा वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे. (सविस्तर वाचा)


पवईतील म्हाडा कॉलनीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारासा भीषण आग लागली. घटनेची माहितीची मिळताच अग्निशामन दलाच्या चार गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जावान युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण समोर आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -