घरCORONA UPDATECorona : पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसांत ४५ रुग्णांचा मृत्यू

Corona : पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसांत ४५ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात आज, गुरूवारी दिवसभरात नव्याने १ हजार ८६४ रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २६ हजार ५३२ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत २ हजार ९६३ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या २ हजार २१९ रुग्णांची तब्येत बरी झाल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १ लाख ६ हजार १९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात १ हजार ११३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १९९ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ५९६ वर पोहोचली असून पैकी ५३ हजार ५०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १३१ एवढी आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मनसेने ३ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना विचारले ‘क्या हुआ तेरा वादा?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -