घरमहाराष्ट्रसंघटित क्षेत्रामध्ये राज्यात ८ लाख रोजगार - मुख्यमंत्री

संघटित क्षेत्रामध्ये राज्यात ८ लाख रोजगार – मुख्यमंत्री

Subscribe

आज स्वातंत्र्या दिनारोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मंत्रालयात ध्वजारोहन करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली आहे.

देशातील गुंतवणुकीपैकी ४२ टक्के गुंतवणूक राज्यात झाली असून, राज्यात मागील एका वर्षात संघटित क्षेत्रात ८ लाख रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहन करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली. राज्यामध्ये परकीय गुंतवणूक राज्यात यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले गेले त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, राज्य आता औद्योगिक क्षेत्रात पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

…तरच राज्य पुढे जाईल – मुख्यमंत्री

सध्या राज्यामध्ये आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व समाज, जाती धर्मातील सौहार्द टिकले तरच राज्य पुढे जाईल असे सांगितले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात बोलताना सांगितले की,” सर्व शहीद जवानांना, स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारांना आणि बळीराजाला स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिवादन करतो, आतापर्यंत आम्ही जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून १६ हजार गावं पाणीदार केली. तर पुढे २५ हजार गावं पाणीदार करण्याचे आमचे उद्दीष्ठ आहे.

२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे सरकारचे उद्दीष्ठ

राज्यातील सर्व झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचे आश्वासन मुख्यंत्र्यांनी दिले आहे. त्यासोबत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल ठरत आहे. तसेच केंद्र सरकारने हमीभाव ठरवताना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा या सूत्राने हमीभाव ठरवला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात अन्न धान्याची खरेदी केली. तर ४५०० कोटी रुपयांची एकूण खरेदी तर गेल्या 3 वर्षात साडे आठ हजार कोटींची रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव आणि उत्तम मार्केट मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -