घरताज्या घडामोडीकेरळमधील RSSचे नेते PFIच्या निशाण्यावर; केंद्र सरकारकडून सुरक्षेत वाढ

केरळमधील RSSचे नेते PFIच्या निशाण्यावर; केंद्र सरकारकडून सुरक्षेत वाढ

Subscribe

देशभरात पीएफआयविरोधात केद्र सरकारने कारवाई केली आहे. पीएफआयवर केंद्रीय गृहमंत्रालयाने 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. या बंदीच्या पार्श्वभूमीवर आता केरळमधील आरएसएस नेत्यांच्या जीवाला पीएफआयकडून धोका असल्याचे समोर आले.

देशभरात पीएफआयविरोधात केद्र सरकारने कारवाई केली आहे. पीएफआयवर केंद्रीय गृहमंत्रालयाने 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. या बंदीच्या पार्श्वभूमीवर आता केरळमधील आरएसएस नेत्यांच्या जीवाला पीएफआयकडून धोका असल्याचे समोर आले. एनआयएच्या अहवालात याबाबत स्पष्ट करण्यात आले असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या माहितीनंतर केंद्र सरकारने केरळच्या 5 आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे समजते. (Central Government Increased Security Kerala Rss Leaders due to Threatened By Pfi Nia Report)

एनआयए आणि आयबीच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 नेत्यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत निमलष्करी दलाचे कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील आरएसएसचे नेते पीएफआयच्या निशाण्यावर असल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी छापेमारीवेळी एनआयएला आरएसएस नेत्यांची यादी मिळाली. या यादीमध्ये आरएसएसच्या 5 नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचे एनआयएच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्रालयाने या पाच नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

Y श्रेणीच्या सुरक्षा

- Advertisement -
  • गृह मंत्रालयाच्या Y श्रेणीच्या सुरक्षेत एकूण 8 सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत.
  • ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते
  • त्याच्या घरी 5 सशस्त्र स्टॅटिक गार्ड बसवले जातात
  • तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात

28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 8 संलग्न संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर सरकारनं हे पाऊल उचललं आहे.


हेही वाचा – व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात, दिल्लीत 25.5 रुपयांनी स्वस्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -