घरमहाराष्ट्रबडीकॉप गस्तीच्या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

बडीकॉप गस्तीच्या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

Subscribe

स्त्रीमधील मातृत्व किंवा वात्सल्य जागे झाल्यास ते दुसर्‍यासाठी कसे वरदान ठरते याची प्रचिती येथील पोलीस ठाण्याच्या बडीकॉप गस्तीच्या दोन महिला कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सार्‍यांनाच आली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलीस ठाण्यांतर्गत थेरोंडा जेत्याची वाडी येथील 30 वर्षीय गर्भवती महिला संगीता भुलाई जैस्वाल ही रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांकडून उपचार घेण्यास नकार देत होती. संगीता चार महिन्याची गर्भवती असल्याने या आरोग्य सेविका वारंवार तिच्या घरी आरोग्य सेवा देण्यासाठी जात असत. मात्र उपचार न घेण्याचा हेका तिने कायम ठेवल्याने तिला आणि तिच्या बाळाच्या जीवितास प्रसुती दरम्यान धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे बाळाची योग्य वाढ होण्याकरिता मिळणार्‍या शासकीय मदतीपासून वंचित राहिली असती.

- Advertisement -

संगीता हिला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य सेविकांनी पोलीस ठाण्याच्या बडीकॉप गस्ती दरम्यान असणार्‍या महिला पोलीस नाईक सुष्मा भोईर आणि अभियंती मोकल यांच्याशी संपर्क साधून सारा प्रकार कथन केला. त्यानंतर भोईर आणि मोकल या संगीता जैस्वाल हिच्या घरी जाऊन प्रसुती काळात आरोग्य सेवा ही बाळासाठी आणि आईसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे पटवून देत तिला आरोग्य सेवा घेण्यास तयार केले. नेहमीच्या कर्तव्या पलीकडे जाऊन या दोघी पोलीस कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सहृदयतेचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -