घरक्राइमधावत्या मेलवर दगड भिरकावला

धावत्या मेलवर दगड भिरकावला

Subscribe

प्रवासी महिलेचा डोळा जायबंदी

कल्याण । मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ राज्य राणी एक्सप्रेस मेलवर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने प्रवास करीत असणार्‍या महिलेच्या डोळ्यावर लागल्याने त्यांना जबर दुखापत झाल्याची घटना सकाळी पावणे नऊच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही महिन्यापूर्वी शहाड ते मुंब्रा दिव्यापर्यंत रेल्वे रुळानजीक फटका गँग आड बाजूचा सहारा घेत दरवाजावर उभे राहत असणार्‍या प्रवाशांच्या हातावर काठीचा जोरदार प्रहार करीत बॅग, मोबाईल हिसकावून, पाडून पळून जात असे.
या फटका गँगची प्रवाशांना भीती होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस आणि आर पी एफ जवानांची सततची रेल्वे रुळावर गस्त घालण्याचे धोरण अवलंबिल्याने चोरट्यांचा धोका कमी झाला.

- Advertisement -

नांदेडहून येत असणार्‍या राज्यराणी एक्सप्रेस मधून दिवा येथे राहत असणार्‍या रखमाबाई पाटील (55) वर्ष या प्रवास करीत होत्या. मध्य रेल्वेचे आंबिवली स्टेशन नजीक मेल मार्गक्रमण करीत असताना कोणीतरी अज्ञाताने दगड भिरकावला असता तो दगड थेट रखमाबाई यांच्या डोळ्याला लागल्याने त्या जायबंदी झाल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात मेल थांबली असता त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणी बाई रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. टिटवाळा आरपीएफ पोलिसांना या दगडफेकीची माहिती मिळाली असता त्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र डोळ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रखमाबाई पाटील बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती टिटवाळा आरपीएफच्या सीनियर इन्स्पेक्टर अंजनी बाबर यांनी दिली आहे. धावत्या मेलवर दगड भिरकवण्याची घटना अत्यंत गंभीर असून या संदर्भात आपण तपास करीत असून जखमीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही अंजनी बाबर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -