घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएसटीची अशीही दुरवस्था; इगतपुरी मार्गावरील बसचे सीटच गायब

एसटीची अशीही दुरवस्था; इगतपुरी मार्गावरील बसचे सीटच गायब

Subscribe

नाशिक : जुने सीबीएस, नाशिक ते इगतपुरी मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमधील ३ सीटच गायब झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकेदायक झाली आहे. त्यात बस मधील थेट सीटच गायब झाल्याची बाब समोर आली आहे. इगतपुरी मार्गावर चालवण्यात येणार्‍या बस क्रमांक एमएच ०७ सी ९१४० या बसमधील सीट गायब झाले आहेत. काही दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यात एक एसटी बस तीन चाकांवरच प्रवास करत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता, अश्या प्रकारे सीट गायब झाल्याने एसटीच्या वाहनांची अवस्था कशी झाली आहे हे लक्षात येते.

नाशिक मधून इगतपुरीकडे जाण्यासाठी बसेसची संख्या अत्यल्प आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला तरीही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही किंवा बसेसची संख्याही वाढवण्यात आलेली नाही. मागील महिन्यातच जुने सीबीएस येथे शाळकरी विद्यार्थिनींनी बस रोखून ठेवत आंदोलन केले होते. बसची क्षमता ५० ते ६० प्रवाश्यांची असताना बसमधून तब्बल १००हून अधिक प्रवासी रोज प्रवास करत असतात. तरीही, अनेक प्रवासी मागे राहून जातात. तसेच, त्या बसचीही अवस्था अत्यंत धोकेदायक आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी बसची संख्या वाढवण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

- Advertisement -

अशी सगळी परिस्थिति असताना एमएच ०७ सी ९१४० क्रमांकाच्या नाशिक-इगतपुरी मार्गावरील बसचे सीटच गायब झाले आहेत. सीट नेमके गेले कुठे ? अश्या पद्धतीने सीट नसलेली बस का चालवली जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. या बस मधील एसटी कर्मचारी, महिला आणि पत्रकारांसाठी आरक्षित असलेले ६ आसनांचे ३ सीट गायब आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना उभ राहूनच प्रवास करावा लागतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -