घरमहाराष्ट्रकसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; 'या' पक्षाने घेतली रिंगणात उडी

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; ‘या’ पक्षाने घेतली रिंगणात उडी

Subscribe

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडून शक्य असतील, तितके प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांना ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असे आवाहन केले आहे. पण आता या निवडणुका लढविण्यासाठी 'आप'कडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सर्व पक्षांना ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर सर्वपक्षीय नेत्यांना याबाबतचे पत्र देखील लिहिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अन्य पक्षातील नेत्यांना फोनाफोनी करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. पण आता तर आम आदमी पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली जात आहे.

आम आदमी पक्षाने नुकतीच दिल्लीच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. पंजाबमध्ये देखील सध्या ‘आप’ची सत्ता आहे. यानंतर आता आप महाराष्ट्रात होणारी पोटनिवडणूक लढण्यासाठी सज्ज झाला आहे. आम आदमी पक्षाकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

या निवडणुकीसाठी आपकडून मुलाखती घेण्यात येत आहेत. आतापर्यंत आपने या दोन्ही जागांसाठी एकूण नऊ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आप या निवडणुका लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका या बिनविरोध तर नक्कीच होणार नाही, हे नक्की झाले आहे.

हेही वाचा – “मतदारांना त्यांचा निर्णय घेऊ द्या…” पोटनिवडणुकीबाबत संजय राऊतांनी केले स्पष्ट

- Advertisement -

दरम्यान, याआधीच आपने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केलेली होती. यासाठी आपकडून मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे. तर मुंबई महानगरपालिकेचे बिगुल वाजले नसले तरी आपकडून मुंबई महानगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपचे प्रभारी गोपाळ इटालीया हे पुण्यात दाखल झाले आहेत. गोपाळ इटालीया यांच्याकडून पुण्यातील आपच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. आज (ता. ५ फेब्रुवारी) आपकडून या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची देखील घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -